जिल्ह्यात वर्षभरात दीड हजार अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 11:09 PM2019-02-03T23:09:08+5:302019-02-03T23:09:27+5:30

राज्य मार्गाच्या चौपदरीकरणाने रस्ते गुळगुळीत आणि चकचकीत झाले. यामुळे वाहनांचा वेग वाढला. हा वेग नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे वर्षभरात जिल्ह्यात तब्बल दीड हजार अपघात घडले. यात ३५० जणांचे बळी गेले, तर ५५२ जणांना कायमचे जायबंदी व्हावे लागले.

District collects one and a half times in a year | जिल्ह्यात वर्षभरात दीड हजार अपघात

जिल्ह्यात वर्षभरात दीड हजार अपघात

googlenewsNext
ठळक मुद्दे३५० बळी : जिल्ह्यात १२ ब्लॅक स्पॉट, रस्ता सुरक्षा अभियान फोल, आजपासून वाहतूक सुरक्षा अभियान

रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्य मार्गाच्या चौपदरीकरणाने रस्ते गुळगुळीत आणि चकचकीत झाले. यामुळे वाहनांचा वेग वाढला. हा वेग नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे वर्षभरात जिल्ह्यात तब्बल दीड हजार अपघात घडले. यात ३५० जणांचे बळी गेले, तर ५५२ जणांना कायमचे जायबंदी व्हावे लागले.
गतवर्षीच्या तुलनेत अपघाताचा आकडा दुपटीने वाढला आहे. २०१८ मध्ये जिल्ह्यात तब्बल दीड हजार अपघातांची नोंद झाली. हे अपघात रोखण्याचे मोठे आव्हान सर्वांसमोरच उभे ठाकले आहे. रस्ते गुळगुळीत झाल्याने अपघाताची संख्या वाढतच आहे. यामुळे आता वाहन चालकांनी जागृत होण्याची गरज आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात वाहनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात वाहनाचा आकडा चार लाख चार हजार ८९२ वर पोहोचला आहे. मात्र मोजक्यांकडेच चालक परवाना आहे.
यावरून वाहनधारकांना चालविण्याचे ज्ञान अपूर्ण असल्याचे स्पष्ट होते. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढतच आहे. काही ठिकाणी रस्त्याच्याकडेला अपघात प्रवणस्थळ, असे फलक दिसतात. कुठे मोठे खड्डे आहेत. राज्य मार्गावर अनेक ठिकाणी क्षमतेपेक्षा मोठे स्पीड ब्रेकर आहे. काही ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग, रेडीयमही लावण्यात आले. तरीही अपघातांच्या संखेत वाढ होत आहे.
बालकांच्या हातात वाहन
अनेक पालक १८ वर्षांपूर्वीच पाल्यांच्या हाती वाहन देतात. ही मुले सुसाट वेगाने वाहने चालवितात. यामुळे शहरातील रस्त्यांवर अपघात घडतात. वाहन चालविताना हेल्मेटही वापरले जात नाही. चारचाकी वाहनात सीट बेल्टचा वापर केला जात नाही. हे प्रकार अपघाताला निमंत्रण देतात. वाहतूक शाखेने सुसाट वेगाने वाहन चालविणाऱ्यांविरूद्ध कंबर कसली. गतवर्षी २४४ वाहनांवर कारवाई झाली. यावर्षी ७२५ वाहनांवर कारवाई करण्यात आली.
ब्लॅक स्पॉट म्हणजे काय
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने ‘ब्लॅक स्पॉट’ची व्याख्या जाहीर केली. ज्या स्थळावर सतत तीन वर्षे अपघात झाले, त्यात चारपेक्षा जादा बळी गेले, असे स्थळ म्हणजे ब्लॅक स्पॉट होय. जिल्ह्यात असे १२ ब्लॅक स्पॉट आहेत. यामध्ये वणी पोलीस ठाण्याअंतर्गत ब्राम्हणी फाटा, रेल्वे क्रॉसिंग, मंदर फाटा, शिरपूर मार्गावरील चारगाव चौकी, आर्णीत कोसदनी घाट, पुसदमध्ये उमरखेड रोडवरील गॅस एजंसी पॉर्इंट, उमरखेड येथे विडूळ फाटा, यवतमाळ ग्रामीणमध्ये हिवरीलगतचा भाग, महागाव येथे महागाव ते कलगाव रोड, नांदगव्हाण घाट, पुसद ग्रामीणमध्ये पॉलीटेक्नीक कॉलेज जवळ विठाळा, कळंबमधील चापर्डा या स्थळांचा समावेश आहे.

Web Title: District collects one and a half times in a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात