जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपवास आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 10:26 PM2018-04-09T22:26:57+5:302018-04-09T22:26:57+5:30
केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातील सामाजिक समता, बंधुता आणि शांतता धोक्यात आली आहे. महाराष्ट्रात भीमा कोरेगाव, मराठा आणि दलित समाजामध्ये संघर्ष पेटविण्याचा झालेला प्रयत्न अशा सर्व घटनांचा निषेध व सामाजिक समता कायम राहावी यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने एक दिवसीय उपवास आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातील सामाजिक समता, बंधुता आणि शांतता धोक्यात आली आहे. महाराष्ट्रात भीमा कोरेगाव, मराठा आणि दलित समाजामध्ये संघर्ष पेटविण्याचा झालेला प्रयत्न अशा सर्व घटनांचा निषेध व सामाजिक समता कायम राहावी यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने एक दिवसीय उपवास आंदोलन करण्यात आले.
येथील तिरंगा चौकात विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, माजी आमदार वामनराव कासावार, विजय खडसे, नंदिनी पारवेकर, विजयाताई धोटे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष माधुरी अराठे, राहूल ठाकरे, बाळासाहेब मांगुळकर, बाबासाहेब गाडे पाटील, अशोक बोबडे, अरुण राऊत, दिनेश गोगरकर, अरविंद वाढोणकर, संध्याताई सव्वालाखे, महिला बालकल्याण सभापती अरुणा खंडाळकर, स्वाती येंडे, जया पोटे, धनराज चव्हाण, साहेबराव खडसे, रामराव पवार, जीवन पाटील, सिकंदर शहा, विनायक भेंडे, रमेश महानूर, अनिल आडे, राजू माहुरे, अरविंद फुटाणे, वसंत निरपासे, नगरसेवक बबलू देशमुख, विक्की राऊत, किरण कुमरे, अरुण ठाकूर, मंगेश पन्हाळकर, आरिज बेग, विशाल पावडे, छोटू सवई, संजय ठाकरे, इस्तियाकभाई, बाजार समिती सभापती रवींद्र ढोक, जानराव गिरी, जावेदभाई, बबलीभाई, शब्बीर खान, जमील पठाण, मनमोहन चव्हाण, प्रकाश नवरंगे, बालू काळे, कृष्णा पुसनाके, अनिल गाडगे, अमेय घोडे आदी उपस्थित होते.