कर्जमुक्तीसाठी ३३५ कोटींचा पहिला टप्पा जिल्ह्याला मिळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 05:00 AM2020-07-09T05:00:00+5:302020-07-09T05:00:21+5:30

कर्जमुक्ती योजनेला बहुप्रतीक्षेनंतर गती मिळण्याचे संकेत मिळाले आहे. यामुळे कर्जमुक्तीला पात्र ठरणाºया शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाविकास आघाडी सरकारने कर्जमुक्ती जाहीर केली. आणि कोरोनामुळे ही कर्जमुक्ती अडचणीत सापडली होती. यासंदर्भात राज्य शासनाने पुढाकार घेत कर्जमुक्ती योजनेत बँकाकडे थेट निधी वळता करण्याचे काम जिल्ह्यात हाती घेतले आहे.

The district got the first phase of Rs 335 crore for debt relief | कर्जमुक्तीसाठी ३३५ कोटींचा पहिला टप्पा जिल्ह्याला मिळाला

कर्जमुक्तीसाठी ३३५ कोटींचा पहिला टप्पा जिल्ह्याला मिळाला

googlenewsNext
ठळक मुद्दे४५ हजार शेतकऱ्यांची चिंता मिटणार : हजारो शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झाले यशस्वी

रूपेश उत्तरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील निम्या पात्र शेतकऱ्यांचा पहिला हप्ता बँकेला मिळाला आहे. यामुळे ४५ हजार शेतकºयांचे ३३५ कोटींचे कर्जमुक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कर्जमुक्ती योजनेला बहुप्रतीक्षेनंतर गती मिळण्याचे संकेत मिळाले आहे. यामुळे कर्जमुक्तीला पात्र ठरणाºया शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाविकास आघाडी सरकारने कर्जमुक्ती जाहीर केली. आणि कोरोनामुळे ही कर्जमुक्ती अडचणीत सापडली होती. यासंदर्भात राज्य शासनाने पुढाकार घेत कर्जमुक्ती योजनेत बँकाकडे थेट निधी वळता करण्याचे काम जिल्ह्यात हाती घेतले आहे.
संपूर्ण जिल्ह्यात एक लाख आठ हजार शेतकरी कर्जमुक्तीच्या योजनेत निवडण्यात आले होते. यातील ९८ हजार शेतकऱ्यांचे अर्ज कर्जमुक्तीसाठी अपलोड झाले. आठ हजार शेतकरी खाते कर्जमुक्तीला अपात्र ठरले आहेत. तर पाच हजार शेतकऱ्यांचे अर्ज अद्यापही कर्जमुक्तीच्या प्रक्रियेत आहे. ८५ हजार खाते कर्जमुक्तीला पात्र ठरले आहेत. त्यापैकी ६९ हजार खातेधारकांनी आधार अथेंटिकेशन पूर्ण केले आहे. अद्याप १६ हजार शेतकऱ्यांचे आधार अपडेशन बाकी आहे.
६९ हजार खात्यापैकी ४५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यातील ३३५ कोटी रूपयांची कर्ज रक्कम जिल्ह्याकडे वळती झाली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण बँक आणि व्यापारी बँकाचा समावेश आहे. या कर्ज रकमेतून बँक शेतकऱ्यांचे खाते निल करण्याची प्रक्रिया राबविणार आहे. उर्वरित ४० हजार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती अद्याप लांबणीवर आहे. त्यांच्यासाठी ३८५ कोटींची गरज आहे.

दुसऱ्या टप्प्यासाठी हवे ३८५ कोटी रुपये
कर्जमुक्तीला पात्र ठरलेल्या ४० हजार शेतकऱ्यांच्या खात्यातील ३८५ कोटींची रक्कम अद्याप जिल्ह्याला प्राप्त व्हायची आहे. ही रक्कमही लवकर प्राप्त होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जिल्ह्याला कर्जमुक्तीची ३३५ कोटींची रक्कम प्राप्त झाली आहे. बँकांनी हा अहवाल सादर केला आहे. यानंतरची कर्ज वितरणाची प्रक्रियाही बँका राबविणार आहे. यामुळे कर्जमुक्तीला गती मिळणार आहे.
- रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक, यवतमाळ

Web Title: The district got the first phase of Rs 335 crore for debt relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.