जिल्ह्यात १९ हजार मतदार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 10:33 PM2019-08-16T22:33:55+5:302019-08-16T22:35:07+5:30

लोकसभा निवडणूक होताच विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. त्यामुळे मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. या विशेष मोहिमेत जिल्ह्यात १९ हजार मतदार वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील मतदारांची संख्या २० लाख ५७ हजारांवर पोहोचली आहे.

The district grew to 90,000 voters | जिल्ह्यात १९ हजार मतदार वाढले

जिल्ह्यात १९ हजार मतदार वाढले

googlenewsNext
ठळक मुद्देदिग्रस विधानसभेत सर्वाधिक : जिल्ह्यात २० लाख ५७ हजार मतदार

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लोकसभा निवडणूक होताच विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. त्यामुळे मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. या विशेष मोहिमेत जिल्ह्यात १९ हजार मतदार वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील मतदारांची संख्या २० लाख ५७ हजारांवर पोहोचली आहे.
निवडणूक विभागाने मतदारांच्या नोंदणीसाठी मतदार नोंदणी अभियान राबविले. या अभियानात नवोदित मतदारांसोबत सुटलेल्या मतदारांची नावे नोंदविण्यात आली. जिल्ह्यात एकूण १९ हजार ७५० मतदारांची नावे नव्याने मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. यापूर्वी जिल्ह्यात २० लाख ३८ हजार मतदार होते. आता त्यात १९ हजार ७५० मतदारांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मतदारांचा आकडा २० लाख ५७ हजार ७५० वर पोहोचला आहे.
नवीन नोंदणी झालेल्यांमध्ये नऊ हजार ९४२ पुरुष, तर नऊ ९ हजार ८०८ महिला मतदारांचा समावेश आहे. यात सर्वाधिक चार हजार ५९ हजार मतदार दिग्रस विधानसभा क्षेत्रात वाढले आहे.
वणी विधानसभा क्षेत्रात तीन हजार १२४, राळेगाव विधानसभा क्षेत्रात दोन हजार ५१७ मतदार वाढले. यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये दोन हजार ७८० मतदार वाढले. यात एक हजार ५०६ पुरुष, तर एक हजार २७४ महिलांचा समावेश आहे. आर्णी विधानसभा क्षेत्रात दोन हजार ६०३ मतदार वाढले असून त्यात एक हजार १६५ पुरुष, तर एक हजार ४३८ महिलांचा समावेश आहे. पुसद विधानसभा क्षेत्रामध्ये दोन हजार ९४३ मतदार वाढले. त्यात एक हजार ६२६ पुरुष, तर एक हजार ३१७ महिला आहे. उमरखेड विधानसभा क्षेत्रात एक हजार ७२४ नवीन मतदार वाढले असून त्यात ७९१ पुरुष, तर ९३३ महिलांचा समावेश आहे.
निवडणुकीवर नवोदित मतदारांचा प्रभाव
मतदार नोंदणी अभियानात १९ हजार ७५० मतदार वाढले. यामध्ये युवा मतदारांचा आकडा मोठा आहे. पूर्वीचे युवा मतदार आणि नवोदित मतदारांमुळे युवकांचा आकडा वाढला. यामुळे निवडणुकीवर त्यांचा प्रभाव राहणार आहे. त्यांच्या दृष्टीने उमेदवार आणि पक्षांना कार्यक्रम, योजना जाहीर कराव्या लागणार आहे.

Web Title: The district grew to 90,000 voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.