जिल्ह्यात ४०२ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 10:11 PM2017-08-20T22:11:42+5:302017-08-20T22:12:06+5:30

जिल्ह्याकडे पाठ फिरविलेल्या पावसाने शनिवारी सर्वदूर हजेरी लावून पोळ्यापूर्वी शेतकºयांना दिलासा दिला. शनिवारी ३१ मिलीमीटर पाऊस पडल्याने जिल्ह्यात आत्तापर्यंत ४०२ मिमी पावसाची नोंद झाली.

The district has 402 mm of rainfall | जिल्ह्यात ४०२ मिमी पाऊस

जिल्ह्यात ४०२ मिमी पाऊस

Next
ठळक मुद्देशनिवारी ३१ मिमी : पोळ्यापूर्वी शेतकºयांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्याकडे पाठ फिरविलेल्या पावसाने शनिवारी सर्वदूर हजेरी लावून पोळ्यापूर्वी शेतकºयांना दिलासा दिला. शनिवारी ३१ मिलीमीटर पाऊस पडल्याने जिल्ह्यात आत्तापर्यंत ४०२ मिमी पावसाची नोंद झाली.
यवतमाळ जिल्हा हमखास पाऊस बरसणाºया प्रांतात येतो. मात्र यावर्षी वरूण राजाने जिल्ह्याकडे पाठ फिरविली आहे. गेल्या अडीच महिन्यात खंडित स्वरूपात पाऊस पडला. यात गेल्या तीन आठवड्यापासून पावसाने पुन्हा डोळ्यात अश्रू आणले. पावसाअभावी खरिपातील पिकेही माना टाकू लागली. मात्र शुक्रवारी व शनिवारी जिल्ह्यात पाऊस परतल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला. शुक्रवारी ८ मिमी, शनिवारी ३१. ३७ मिमी पावसाची नोंद झाली. या हंगामातील शनिवार हा पावसासाठी सर्वात श्रीमंत वार ठरला. दोन दिवसांच्या पावसाने खरीप पिकांना तारले आहे. मात्र नदी आणि नाल्यांना अद्यापही मोठे पूर गेले नाही. यामुळे जलप्रकल्पांची स्थिती अद्याप चिंताजनक आहे. वेधशाळेने येत्या बुधवारपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. वेधशाळेचा अंदाज तंतोतंत खरा ठरल्यास जिल्ह्यातील जलप्रकल्प काही अंशी भरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
असा बरसला पाऊस
यावर्षी आतापर्यंत ४०२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यात यवतमाळ तालुक्यात २४, बाभूळगाव ४२, आर्णी २८, कळंब १४, दारव्हा १७, दिग्रस ३८, नेर ३३, पुसद ४१, उमरखेड ४३, महागाव ५२, केळापूर २८, घाटंजी ८, राळेगाव १७, वणी ४४, मारेगाव ३५ आणि झरीमध्ये ३६ मिमी पावसाची नोंद झाली. महागाव तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे. खरिपाची पिके या पावसाने तरतील, मात्र जोरदार पाऊस न झाल्यास रबी हंगाम अडचणीत येणार आहे.
निळोणाला दमदार पावसाची प्रतीक्षाच
शहराला पाणी पुरवठा करणाºया निळोणा जलाशयात आत्तापर्यंत १२६२.२ इंच जलसाठा झाला आहे. आणखी १२ फूट पाण्याचा संचय झाल्यानंतर हा प्रकल्प ओव्हर फ्लो होणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाºया निळोणाची क्षमता १२७४ फुटांची आहे. गेल्या दोन दिवसांत या प्रकल्पात ६ इंच पाणी वाढले.

Web Title: The district has 402 mm of rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.