जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 05:00 AM2020-07-30T05:00:00+5:302020-07-30T05:00:11+5:30

घाटंजी येथील समर्थ विद्यालयाची मंजिरी मनोज गवळी, कोषटवार विद्यालय पुसदची सिद्धी विवेक सावरकर, राणी लक्ष्मीबाई विद्यालय यवतमाळची श्रेया संदीप देशपांडे या तिघांनी समान ९९.६० टक्के (गुण ४९८) मिळवित जिल्ह्यातून संयुक्त दुसरा क्रमांक प्राप्त केला. तर तिसऱ्या क्रमांकासाठी एसपीएम कन्या शाळा घाटंजीची हिमांशू वासुदेव केराम, ढाणकी येथील हनिफ मास्टर उर्दू हायस्कूलची अरिबा तकदीस या दोघींनी ९९.२० टक्के असे समान गुण घेतले आहे.

In the district, only girls won in the 10th standard examination | जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी

जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी

Next
ठळक मुद्देविशाखा सारडे प्रथम : मंजिरी, सिद्धी, श्रेया द्वितीय, हिमांशी, अरिबा तृतीय क्रमांकावर

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दहावीच्या निकालात दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली. पहिल्या तीनमध्ये मुलीच जिल्ह््यातून टॉपर आहेत. यवतमाळच्या राणी लक्ष्मीबाई विद्यालयाची विशाखा अतुलकुमार सारडे ९९.८० टक्के (गुण ४९९) घेत पहिला क्रमांक पटकाविला. जिल्ह्याचा एकूण निकाल ९४.६३ टक्के लागला आहे.
घाटंजी येथील समर्थ विद्यालयाची मंजिरी मनोज गवळी, कोषटवार विद्यालय पुसदची सिद्धी विवेक सावरकर, राणी लक्ष्मीबाई विद्यालय यवतमाळची श्रेया संदीप देशपांडे या तिघांनी समान ९९.६० टक्के (गुण ४९८) मिळवित जिल्ह्यातून संयुक्त दुसरा क्रमांक प्राप्त केला. तर तिसऱ्या क्रमांकासाठी एसपीएम कन्या शाळा घाटंजीची हिमांशू वासुदेव केराम, ढाणकी येथील हनिफ मास्टर उर्दू हायस्कूलची अरिबा तकदीस या दोघींनी ९९.२० टक्के असे समान गुण घेतले आहे.
जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेसाठी ३९ हजार २१८ विद्यार्थी होते. त्यापैकी ३८ हजार ८६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेमध्ये ३६ हजार ७७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दोन हजार ८५ विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची तयारी करावी लागणार आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये दहा हजार ६५१ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले. प्रथम श्रेणीमध्ये १४ हजार ७१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. द्वितीय श्रेणीत नऊ हजार १३६ तर तृतीय श्रेणीमध्ये दोन हजार २७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

विशाखाला डॉक्टर व्हायचे आहे, पुढील शिक्षण यवतमाळातच
सध्याचा कोरोनाचा प्रकोप पाहता विशाखाने भविष्यात डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला आहे. ती डॉक्टर होऊन गरिबांची सेवा करायची आहे. विशाखाने ९९.८० गुण मिळविण्यासाठी हार्डवर्क केले आहे. ती दररोज साडेतीन तास अभ्यास करीत होती. शिकवणी वर्गाच्या व्यतिरिक्त हा अभ्यास नियमित असल्याचे ती म्हणाली. तिला विज्ञान विषयात १०० पैकी १०० गुण, संस्कृतमध्ये ९८ गुण, सोशल सायन्समध्ये ९८, गणितामध्ये ९७ गुण मिळाले आहे. विशाखाने आई-वडील आणि गुरुजणांमुळे चांगले गुण मिळविता आल्याचे मत व्यक्त केले आहे. तिला कथ्थक नृत्यामध्ये राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे.

शेतकरी आत्महत्याग्रस्त परिवारातील कन्या गुणवत्ता यादीत
घाटंजी तालुक्यातील वघारी टाकळी येथील हर्षिता रमेश मुद्देलवार या विद्यार्थिनींने अभ्यंकर कन्या शाळेतून ४६७ गुण मिळवित गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. हर्षिताच्या वडिलांनी २०१७ मध्ये कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती अतिशय नाजूक आहे. या परिस्थितीतही हर्षिताने मन लावून अभ्यास करीत ९३.४० टक्के गुण मिळविले आहे. तिला पुढील काळात अभियंता व्हायचे आहे. याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कामही करायचे आहे.

Web Title: In the district, only girls won in the 10th standard examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.