जिल्ह्याला मिळाले १२३ कोटी

By admin | Published: January 13, 2015 11:08 PM2015-01-13T23:08:07+5:302015-01-13T23:08:07+5:30

खरीप हंगामातील कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करुन दिला आहे.

District received 123 crores | जिल्ह्याला मिळाले १२३ कोटी

जिल्ह्याला मिळाले १२३ कोटी

Next

यवतमाळ : खरीप हंगामातील कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करुन दिला आहे. जिल्ह्यास १२२ कोटी ८० लक्ष रुपये प्राप्त झाले असून सदर निधी या आठवड्यात तातडीने शेतकऱ्यांना वितरित करा, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी केल्या.
पालकमंत्र्यांनी विश्राम भवन येथे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत वाटपासाठी १२२ कोटी ८० लाख रुपये प्राप्त झाले असून मदतीसाठी पात्र ठरणाऱ्या ४ लाख ५० हजारांवर शेतकऱ्यांना सदर मदत या आठवड्याच्या शेवटपर्यंत वितरित करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. २ हेक्टरपर्यंत प्रती हेक्टरी ४ हजार पाचशे रुपये मदत दिली जाणार आहे.
प्रत्येक गावातील तलाठी कार्यालये व पोलीस ठाणे असलेल्या गावी पोलीस पाटील भवन बांधण्याचा एकत्रित कार्यक्रम राबविता येईल काय, यावर यावेळी विचार करण्यात आला.
अतिक्रमण मोहिमेंतर्गत अनेक व्यावसायिकांची दुकाने हटविण्यात आली. अशा व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक ठिकाणी जागा निश्चित करावी, त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात करार तत्वावर गाळे काढून त्यांना वितरित करावी तसेच राज्यात काही ठिकाणी अशा अतिक्रमणधारकांचे कशा प्रकारे पुनर्वसन करण्यात आले आहे, त्याची माहिती घेण्याची सूचनाही पालकमंत्र्यांनी केली. जिल्ह्यात दारिद्र्यरेषेच्या निकषात नसणाऱ्यांना यादीतून वगळून त्या ठिकाणी खऱ्या कुटुंबांना सामावून घेणे आवश्यक आहे. या बाबतीत अपिलात करणाऱ्या कार्डधारकांना निकष तपासून सामावून घेण्यात यावे. राजस्व अभियानाअंतर्गत पांदण रस्ते खुले करण्याचा धडक कार्यक्रम राबविण्यासोबतच जिल्हा वार्षीक योजनेतून शेतकऱ्यांसाठी अनुदान तत्त्वावर कुंपण याजना राबविता येईल काय याबाबत बैठकीत चर्चा झाली. वाळू धोरण, महसुली गावांना दर्जा, रिक्त पदे, वन जमीनीवरील लिज पट्टे, पूरसंरक्षक भिंती, कोंडवाडा बांधकाम आदींवरही यावेळी चर्चा झाली. (प्रतिनिधी)

Web Title: District received 123 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.