जिल्हा शालेय कराटे स्पर्धा पोलीस संरक्षणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 01:27 AM2017-10-12T01:27:37+5:302017-10-12T01:27:47+5:30

स्थानिक दोन संघटनेच्या वादामुळे शासनाच्या जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धा पोलीस संरक्षणात व प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकाºयांच्या पूर्णवेळ उपस्थितीत घेण्यात आल्या.

District school karate competition protects police | जिल्हा शालेय कराटे स्पर्धा पोलीस संरक्षणात

जिल्हा शालेय कराटे स्पर्धा पोलीस संरक्षणात

Next
ठळक मुद्देअमरावतीचे पंच : जिल्हा क्रीडा अधिकाºयांच्या उपस्थितीत पार पडले सामने, दोन संघटनांचा वाद

नीलेश भगत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्थानिक दोन संघटनेच्या वादामुळे शासनाच्या जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धा पोलीस संरक्षणात व प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकाºयांच्या पूर्णवेळ उपस्थितीत घेण्यात आल्या. विभागीय नेहरू कप हॉकीनंतर कराटे या खेळातही परजिल्ह्यातील पंचाकडून ‘पंचगिरी’ करण्यात आली.
जिल्ह्यात कराटे या खेळाच्या यवतमाळ डिस्ट्रीक्ट कराटे असोसिएशन व अ‍ॅमेचर कराटे डो असोसिएशन यवतमाळ अशा दोन संघटना आहेत. या दोनही संघटनेने शालेय स्पर्धेत तांत्रिक सहकार्य करण्याची परवानगी क्रीडा कार्यालयाला मागितली. उभय संघटनांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या वैधतेबाबत प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकाºयांना योग्यवेळी निर्णय न घेतल्याने कराटे स्पर्धा स्थगित कराव्या लागल्या. पुढे वाद विकोपाला जात असल्याचे पाहताच जिल्हा क्रीडा कार्यालयाने शालेय कराटे स्पर्धा स्वत:च्याच अधिपत्याखाली घेण्याचा निर्णय घेतला. तांत्रिक सहकार्य म्हणून अमरावती जिल्ह्यातील पंच आमंत्रित करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
नेहरू स्टेडियम येथे १० व ११ आॅक्टोबर रोजी १४, १७, १९ वर्षे मुले-मुलींच्या स्पर्धा घेण्यात आल्या. पहिल्या दिवशी स्पर्धेत दोनही संघटनेकडून कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी पोलीस संरक्षणात स्पर्धा घेण्यात आल्या. प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटिये हे पूर्णवेळ स्पर्धास्थळी उपस्थित होते. क्रीडा कार्यालयाने स्पर्धेसाठी खेळाडूंसोबत केवळ शारीरिक शिक्षकांनाच प्रवेश दिला.
नियमानुसार ‘पंचगिरी’ नाही
जिल्हा क्रीडा कार्यालयाने शालेय कराटे स्पर्धेसाठी अमरावती जिल्ह्यातील पंच आमंत्रित केले होते. या पंचांनी वर्ल्ड कराटे फेडरेशन आणि भारतीय आॅलिम्पिक संघाची मान्यता असणाºया नियमावलीप्रमाणे पंचगिरी करणे अपेक्षित होते. मात्र या पंचांनी स्पर्धेत नियमावलीची पायमल्ली करीत निर्णय दिले. त्यामुळे जिल्ह्यातून राज्य, राष्ट्रीय पातळीवर जाणाºया कराटे खेळाडूंचे नुकसान झाल्याची तक्रार यवतामळ डिस्ट्रीक्ट कराटे असोसिएशनचे सचिव आनंद भुसारी यांनी प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटिये यांना दिली. या तक्रारीने क्रीडा कार्यालयाने स्वत:च्याच अधिपत्याखाली आयोजित केलेली शालेय कराटे स्पर्धा वादाच्या भोवºयात अडकण्याची चिन्हे दिसत आहे.
खेळाडूंनी फिरविली पाठ
शालेय कराटे स्पर्धेत दोन संघटनेचा वाद व स्पर्धेला मिळालेली स्थगिती या कारणामुळे जिल्ह्यातून ८० शालेय संघातील ८०० ते ९०० खेळाडूंची नोंदणी झालेल्या या स्पर्धेत केवळ ४५ खेळाडूंनी सहभाग घेतला. इतर खेळाडूंनी स्पर्धेकडे पाठ फिरविली.

Web Title: District school karate competition protects police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.