आष्टोना येथे जिल्हा परिषद शाळेची वर्गखोली कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 09:29 PM2019-07-02T21:29:06+5:302019-07-02T21:29:24+5:30
जिल्हा परिषद शाळेची वर्गखोली कोसळल्याची घटना मंगळवारी रात्री आष्टोना (ता.राळेगाव) येथे घडली. या प्रकारात शाळेतील डेस्क, बेंच व इतर साहित्याचे नुकसान झाले. वर्गखोलीची भिंत जीर्ण झालेली असताना शाळेने केलेल्या दुर्लक्षामुळे पालकांमध्ये कमालीचा रोष आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खैरी : जिल्हा परिषद शाळेची वर्गखोली कोसळल्याची घटना मंगळवारी रात्री आष्टोना (ता.राळेगाव) येथे घडली. या प्रकारात शाळेतील डेस्क, बेंच व इतर साहित्याचे नुकसान झाले. वर्गखोलीची भिंत जीर्ण झालेली असताना शाळेने केलेल्या दुर्लक्षामुळे पालकांमध्ये कमालीचा रोष आहे.
आष्टोना येथील जिल्हा परिषद शाळेत एक ते आठपर्यंत वर्ग आहे. जवळपास १०० विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. यासाठी वेगवेगळ्या वर्गखोल्या आहेत. मागील आठ दिवसांपासून या परिसरात पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे या शाळेची जार्ण झालेली वर्गखोली अधिकच कमकुवत होऊन मंगळवारी रात्री कोसळली. हा प्रकार रात्रीच्यावेळी घडल्याने मोठा अनर्थ टळला. टीनपत्रे टाकून असलेली ही खोली होती. शिक्षण विभागाने शिकस्त शाळांकडे आतातरी लक्ष द्यावे, त्यांचे पुनर्बांधकाम करावे, अशी मागणी होत आहे.