भांब राजा येथील १३० वर्षे जुनी गायगोधन परंपरा, पाडव्यादिवशी घोंगडीवर बसवितात गाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 04:23 PM2019-10-28T16:23:30+5:302019-10-28T16:23:52+5:30
यवतमाळ तालुक्यातील हिवरीलगतच्या भांब राजा येथे गेल्या १३० वर्षांपासून गायगोधनाची परंपरा सुरू आहे.
यवतमाळ : तालुक्यातील हिवरीलगतच्या भांब राजा येथे गेल्या १३० वर्षांपासून गायगोधनाची परंपरा सुरू आहे. तेथील मलकोजी महाराज संस्थानतर्फे दिवाळीच्या पाडव्याला घोंगडीवर गायी बसविणे आणि मारुती मंदिराच्या पारावर गाई चढविण्याची स्पर्धा घेतली जाते.
गेल्या १३० वर्षांपासून भांबराजा (जि.यवतमाळ) येथील गायक्यांनी ही परंपरा जोपासली आहे. यात दिवाळीच्या पाडव्याला गावातील मलकोजी महाराज संस्थान परिसरात घोंगडीवर गाई बसविण्याची स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेत कमीत कमी वेळात जास्तीत जास्त गाई घोंगडीवर बसविणाºया गायक्याला बक्षीस दिले जाते. यानंतर मंदिराच्या पारावर (पायºयांवर) गाईचा लढविण्याची स्पर्धा सुरू होते. या स्पर्धेत कमीत कमी वेळात जास्तीत जास्त गाई पारावर चढविणाऱ्या गायक्याला विजयी घोषित केले जाते.
या दोन्ही स्पर्धेत पारंपारिक गायकी डफडी आणि बासरीच्या तालावर आपल्या गार्इंना घोंगडीवर बसवितात. तसेच बासरी आणि डफडीच्या तालावर पारावर चढविले जाते. ही स्पर्धा बघण्यासाठी पंचक्रोषितील नागरिकांची गर्दी होते. विशेष म्हणजे काही गायकी घोंगडी पांघरुन स्वत:च्या पोटावर गार्इंना खाली बसवितात. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा जोपासली जात आहे.