डोळ्यात नाही, आता गावात पाणी आणूया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 11:54 PM2018-04-06T23:54:18+5:302018-04-06T23:54:18+5:30

पावसाच्या पाण्याचे नियोजन नसल्याने गावच्या-गावे पाणी टंचाईच्या लाटेत होरपळत आहे. गावकऱ्यांच्या डोळ्यात पाण्यासाठी पाणी येऊ लागले, ही वास्तविकता आहे.

Do not get in the eye, now bring water to the village | डोळ्यात नाही, आता गावात पाणी आणूया

डोळ्यात नाही, आता गावात पाणी आणूया

Next
ठळक मुद्देसंकल्प : कळंब तालुक्यातील ९३ गावे ‘वॉटर कप’मध्ये, नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागात कामांना सुरुवात

गजानन अक्कलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : पावसाच्या पाण्याचे नियोजन नसल्याने गावच्या-गावे पाणी टंचाईच्या लाटेत होरपळत आहे. गावकऱ्यांच्या डोळ्यात पाण्यासाठी पाणी येऊ लागले, ही वास्तविकता आहे. परंतु आता ‘डोळ्यात नाही तर, गावात पाणी आणूया’, हा संकल्प ९३ गावातील लोकांनी केला आहे. वॉटर कप स्पर्धेत सहभागी होत टंचाईमुक्त गावासाठी त्यांची धडपड सुरू आहे.
गतवर्षी ६४ गावांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. खडकी, शंकरपूर, राजूर, गणेशवाडी, खटेश्वर आदी गावांनी दखलपात्र कामे केली. यावर्षी स्पर्धेत ९३ गावे सहभागी झालीत. ६० गावातील लोकांनी स्वयंस्फूर्तीने प्रशिक्षण पूर्ण करुन जलसंधारणाच्या कामांना सुरुवात केली. यात नरसापूर, इचोरा, रासा, उमरी, गांढा, खडकी, नांझा, सावंगी (डाफ), निमगव्हाण आदी गावाचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून सत्यमेव जयते वॉटर कप राबविली जात आहे. ही स्पर्धा म्हणजे जलसंधारण व मृदसंधारणाचे यथायोग्य व्यवस्थापन करणे होय. या स्पर्धेत गावांच्या पुढाकारातून केलेले सामूहिक प्रयत्न हीच या कामाची कसोटी लावणारी आहे. रोपवाटिका, शोषखड्डे, चर, बीज संकलन, तळे या कामांना गती देण्यात आली आहे. स्पर्धा ही ८ एप्रिल ते २२ मे दरम्यान होत असली तरी, अनेक गावात आतापासूनच कामाला सुरुवात झाली आहे.
लोकांचा उत्साह वाढावा यासाठी उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी डॉ.मनोहर नाल्हे, सहायक गटविकास अधिकारी पद्माकर मडावी, पाणी फाऊंडेशनच्या तालुका समन्वयक अर्चना दवारे यांच्या मार्गदर्शनात गावागावात शिवारफेरी आयोजित केली जात आहे. यामध्ये ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी यांचा सकारात्मक प्रयत्न गावातील नागरिकांचा उत्साह वाढविणारा ठरत आहे.
योजनेविषयी उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार म्हणाले, राळेगाव उपविभागातील कळंब आणि राळेगाव तालुक्यात अनेक गावांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. दुष्काळावर मात करण्याºया या कामात सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाºयांना प्रामाणिकपणे सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे येणाºया काळात दुष्काळावर निश्चित मात करु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लोकसहभागातून उभी झाली मोठी रक्कम
गतवर्षी अनेक गावात तीन ते साडेतीन लाख रुपये लोकसहभागातून उभे झाले होते. यामध्ये स्वयंसेवी संस्थांचाही मोठा सहभाग होता. याहीवर्षी अनेक गावातील दानशूर व्यक्ती स्पर्धेत तन-मन ऐवढेच नाही तर धन देऊनही आपला खारीचा वाटा उचलत आहे.

Web Title: Do not get in the eye, now bring water to the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी