वाघाला मारू नका, बेशुद्ध करून पकडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 10:06 PM2018-09-15T22:06:31+5:302018-09-15T22:07:03+5:30

राळेगाव, कळंब आणि पांढरकवडा तालुक्यात १५ जणांचा बळी घेणाऱ्या वाघाला ठार मारण्यासाठी वनविभागाने पूर्ण तयारी केली आहे. मात्र या वाघाला ठार न मारता बेशुध्द करून पकडावे, यासाठी वन्यजीवप्रेमींची धडपड सुरू आहे.

Do not kill the tiger, get caught and unconscious | वाघाला मारू नका, बेशुद्ध करून पकडा

वाघाला मारू नका, बेशुद्ध करून पकडा

Next
ठळक मुद्देवन्यजीवप्रेमींची विनंती : प्रधान मुख्य वनसंरक्षकांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राळेगाव, कळंब आणि पांढरकवडा तालुक्यात १५ जणांचा बळी घेणाऱ्या वाघाला ठार मारण्यासाठी वनविभागाने पूर्ण तयारी केली आहे. मात्र या वाघाला ठार न मारता बेशुध्द करून पकडावे, यासाठी वन्यजीवप्रेमींची धडपड सुरू आहे. मुख्य वनसंरक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.
वाघाला मारण्यासाठी हैदराबादचा नवाब शपथअल्ली याला बोलाविले आहे. तो केवळ प्राण्यांना मारतो. वाघाला बेशुध्दही करता आले असते. मात्र तसे केले जात नाही. याशिवाय इतरही आरोप या व्यक्तीवर आहे. असे असतानाही नवाबाला वाघ मारण्याची जबाबदारी दिली आहे. नवाब अवैध धंद्यामध्ये गुंतला आहे. अवैध शिकारीत त्याचा सहभाग आहे. यामुळे नबाबाला हटविण्यात यावे, एनसीटीएने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार वाघाला जेरबंद करावे, या मागणीचे निवेदन प्रधान मुख्य वनसंरक्षकाला देण्यात आले.
वाईल्ड लाईफ कंझरवेशन अ‍ॅन्ड रिसर्च, कोबरा अ‍ॅडव्हेन्चर अ‍ॅन्ड नेचर, एमएच २९ हेल्पींग हँड, बहार नेचर क्लब वर्धा, हेल्प फाउंडेशन अमरावती, विदर्भ जैवविविधता रक्षक आदी संघटनेचे पराग दांडगे, विक्की गावंडे, सुमित गवई, रत्नदीप वानखडे, कुणाल मेश्राम, श्याम जोशी आदींनी निवेदन दिले.

Web Title: Do not kill the tiger, get caught and unconscious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.