डाॅक्टरचा मारेकरी सहा दिवस लोटूनही पोलिसांच्या टप्प्याबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 05:00 AM2022-01-17T05:00:00+5:302022-01-17T05:00:39+5:30
मंगळवारी डाॅ. धर्मकारे यांची रुग्णालय परिसरातच मास्कधारी युवकाने गोळ्या झाडून हत्या केली. त्याला पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या ढाणकी येथील चार जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, मुख्य मारेकरी शेख ऐफाज अद्याप मोकाट आहे. खुद्द पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, एसडीपीओ प्रदीप पाडवी, ठाणेदार अमोल माळवे हे तपासावर नजर ठेवून असले तरी आरोपी मोकाट आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : येथील उपजिल्हा रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डाॅ. हनुमंत धर्मकारे यांची मंगळवारी भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली असली तरी मुख्य मारेकरी सहा दिवस लोटूनही पोलिसांच्या टप्प्यात आलेला नाही. अटक असलेल्या चार आरोपींना न्यायालयाने २३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मंगळवारी डाॅ. धर्मकारे यांची रुग्णालय परिसरातच मास्कधारी युवकाने गोळ्या झाडून हत्या केली. त्याला पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या ढाणकी येथील चार जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, मुख्य मारेकरी शेख ऐफाज अद्याप मोकाट आहे. खुद्द पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, एसडीपीओ प्रदीप पाडवी, ठाणेदार अमोल माळवे हे तपासावर नजर ठेवून असले तरी आरोपी मोकाट आहे. दहा तपास पथकांच्या मेहनतीला अद्याप तरी यश आलेले नाही.
आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षेचे वातावरण
- डाॅ. धर्मकारे यांचा भरदिवसा खून झाल्याने येथील उपजिल्हा रुग्णालयातील इतर डाॅक्टरांसह सर्वच आरोग्य कर्मचारी दहशतीच्या वातावरणात आहे. आपल्या संरक्षणाची कोणतीही सोय नसल्याची व्यथा त्यांनी एसपींकडे व्यक्त केली.