महाराष्ट्राचा बिहार करता का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 10:13 PM2017-11-21T22:13:19+5:302017-11-21T22:14:38+5:30

जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत सदस्य पारदर्शक प्रशासनावर भडकले. सदस्यांनी थेट सीईओंवर मनमानी करीत असल्याचा आरोप करून अधिकारी, कर्मचारी तुमच्या दहशतीखाली वावरत असल्याचा आरोप केला.

Does Bihar do Maharashtra? | महाराष्ट्राचा बिहार करता का?

महाराष्ट्राचा बिहार करता का?

Next
ठळक मुद्देस्थायी समितीचा सीईओंना सवाल : जिल्हा परिषदेचे अधिकारी दहशतीत

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत सदस्य पारदर्शक प्रशासनावर भडकले. सदस्यांनी थेट सीईओंवर मनमानी करीत असल्याचा आरोप करून अधिकारी, कर्मचारी तुमच्या दहशतीखाली वावरत असल्याचा आरोप केला.
जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी अनिल आडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी स्थायी समितीची सभा झाली. त्यात नायगाव आरोग्य उपकेंद्रातील महिला कर्मचाºयाच्या अंशत: बदलीचे प्रकरण श्रीधर मोहोड यांनी उपस्थित केले. त्यांना मादणी येथील रिक्त पदावर नियुक्ती का दिली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक सिंगला यांनी तिनदा त्यांना नियुक्ती आदेश देऊनही त्या संबंधित ठिकाणी रुजू झाल्या नसून न्यायालयात गेल्याचे स्पष्ट केले.
यानंतर सभागृहात मोहोड यांनी रूद्रावतार धारण करून थेट सीईओंवर गंभीर आरोप केले. तुमची मनमानी सुरू असून अधिकारी, कर्मचारी तुमच्या दहशतीखाली वावरत आहे. तुम्ही महाराष्ट्राचा बिहार करून राहिले का, तुमची मनमानी चालणार नाही, असे ठणकावले. तसेच दुसºया एका प्र्रकरणात पाच वर्षांनी न्यायालयात अपिल दाखल केले. ते न्यायालयाने फेटाळले. त्यावर अडीच लाखांचा खर्च झाला. हा खर्च सीईओंकडून वसूल करावा, अशी मागणी केली. यानंतर सभागृहात वादंग निर्माण झाले. त्यात गजानन बेजंकीवारही आक्रमक झाले. सर्वच सदस्य चढ्या आवाजात बोलू लागल्याने अखेर अध्यक्षांनी सर्वांनाच शांत राहण्याचा सल्ला देत सीईओंच्या चारित्र्यावर ंिशंतोडे उडवू नका, अशी तंबी दिली.
शिक्षण, आरोग्य, कृषी, समाजकल्याण आदी विषयांवरील चर्चेतही अनेकदा वाद निर्माण झाला. अधिकारी पूर्ण माहिती घेऊन सभागृहात येत नसल्याबद्दल सदस्यांनी रोष व्यक्त केला. नंतर चालबर्डी येथील शिक्षकाच्या मुद्यावरून पुन्हा गजानन बेजंकीवार, श्रीधर मोहोड यांनी सभागृह डोक्यावर घेतले. टेबलवर आदळआपट करीत नियमाने कारवाई करण्याची मागणी केली. अन्यथा सभागृहातून बहिर्गमन करण्याची धमकी दिली. बांधकाम सभापती निमीष मानकर आणि त्यांच्यात खडाजंगी झाली. राम देवसरकर यांनी मध्यम मार्ग सूचविला. काही वेळानंतर पुढील प्रश्नावर चर्चा सुरू झाली अन् वादंग शमले.
सभेत महिला व बालकल्याण सभापती अरूणा खंडाळकर, शिक्षण सभापती नंदिनी दरणे, मंगला पावडे, जया पोटे, राम देवसरकर, प्रकाश राठोड, बाळा पाटील, पंकज मुडे आदींनी विविध मुद्दे उपस्थित केले. तथापि सभेत विकासाच्या मुद्यांपेक्षा बदली, अंशत: बदली, समायोजन यातच काही सदस्यांना ‘इंटरेस्ट’ असल्याचे दिसून आले. दरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत स्थायी समितीची बैठक सुरू होती.
तूर फवारणी विषबाधेवर चर्चा
राम देवसरकर यांनी ‘लोकमत’चा हवाला देत तूर फवारणीतून विषबाधा झाल्याने सहा शेतकरी, मजूर रूग्णालयात दाखल असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्यासह श्रीधर मोहोड यांनी यापूर्वी २२ शेतकºयांचा फवारणीने बळी घेतल्याचे सांगितले. मात्र तूर फवारणी विषबाधेची आरोग्य विभागाकडे कोणतीच माहिती नसल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
सदस्य म्हणून लाज वाटते
गेल्या नऊ महिन्यांपासून लाभार्थ्यांना साधे आईल इंजिन देऊ शकलो नाही. समाजकल्याण विभाग टाळाटाळ करीत आहे. लाभार्थ्यांचे साधे काम करू शकत नसल्यामुळे आम्हाला सदस्य म्हणून काम करताना लाज वाटते, अशा स्पष्ट शब्दात भाजपाच्या गटनेत्या मंगला पावडे यांनी संताप व्यक्त केला. जयश्री पोटे यांनी त्यांना समर्थन दिले.

Web Title: Does Bihar do Maharashtra?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.