लॉकडाऊन नकोच, गरिबांना जगू द्या हो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:41 AM2021-04-08T04:41:16+5:302021-04-08T04:41:16+5:30
घाटंजी : कोरोनाशी लढताना नियम कठीण करा; पण लॉकडाऊन नकोच, अशी भूमिका येथील सामान्यांनी घेतली आहे. त्यासाठी त्यांनी तहसीलदारांमार्फत ...
घाटंजी : कोरोनाशी लढताना नियम कठीण करा; पण लॉकडाऊन नकोच, अशी भूमिका येथील सामान्यांनी घेतली आहे. त्यासाठी त्यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे की, कोरोनासोबत आपल्याला जगावे लागेल. एक वर्षापासून अनेक क्षेत्रांतील व्यावसायिक व त्यांचे कर्मचारी हलाखीचे जीवन जगत आहेत. त्यांच्या जगण्याची अगोदर सोय करा आणि मग लॉकडाऊन करा, अशी मागणी आहे.
काही प्रमाणात लॉकडाऊन पाहिजे असे म्हणणारे आहेत. ते शासकीय कर्मचारी किंवा गर्भश्रीमंत आहेत. त्यांचा विचार करू नका. केवळ जे उपाशी आहेत, त्यांचा विचार करा. नियम कितीही कठोर असू द्या. जनता त्याचे पालन करेल. मात्र, लॉकडाऊन नकोच, अशी त्यांची भूमिका आहे. संपूर्ण भारतात अशी अनेक कुटुंबे आहेत, की त्यांच्या घरात एकच कमविता आहे. बाकीचे त्याच्यावर अवलंबून असतात. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंतचा लॉकडाऊनचा निर्णय मागे घेऊन, त्याऐवजी आठवड्यातून चार दिवस व्यवसाय करण्याची सूट द्यावी आणि तीन दिवस लॉकडाऊन करावा, अशी मागणी करण्यात आली. लॉकडाऊन कायम राहिल्यास लोक उपासमारीमुळे आत्महत्या करतील. त्यामुळे महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी बारकाईने विचार करावा, अशी मागणी जितेंद्र विलास जुनघरे व इतरांनी निवेदनातून केली आहे.