राज्यात दूरदर्शनच्या मराठी वाहिनीचेच प्रक्षेपण; हिंदी प्रक्षेपण बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 11:00 PM2020-07-09T23:00:00+5:302020-07-09T23:00:02+5:30

केंद्र सरकारच्या प्रसार भारती मंत्रालयांतर्गत येणाऱ्या दूरदर्शनचे अनेक लघु प्रक्षेपण केंद्र बंद होणार आहे. काही केंद्रांवरून आता केवळ दूरदर्शनच्या मराठी वाहिनीचेच प्रक्षेपण केले जाणार असून हिंदी वाहिनीचे प्रसारण १५ जुलैपासून बंद होणार आहे.

Doordarshan's Marathi channel broadcasts in the state; Hindi broadcast off | राज्यात दूरदर्शनच्या मराठी वाहिनीचेच प्रक्षेपण; हिंदी प्रक्षेपण बंद

राज्यात दूरदर्शनच्या मराठी वाहिनीचेच प्रक्षेपण; हिंदी प्रक्षेपण बंद

Next
ठळक मुद्दे१५ जुलैपासून होणार अंमलबजावणी

प्रकाश लामणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : केंद्र सरकारच्या प्रसार भारती मंत्रालयांतर्गत येणाऱ्या दूरदर्शनचे अनेक लघु प्रक्षेपण केंद्र बंद होणार आहे. काही केंद्रांवरून आता केवळ दूरदर्शनच्या मराठी वाहिनीचेच प्रक्षेपण केले जाणार असून हिंदी वाहिनीचे प्रसारण १५ जुलैपासून बंद होणार आहे.
प्रसार भारतीअंतर्गत राज्यात दूरदर्शनची लघु प्रक्षेपण केंद्रे कार्यरत आहे. प्रसार भारतीच्या नांदेड येथील दूरदर्शन केंद्रांतर्गत येणाºया पुसद येथील लघु प्रक्षेपण केंद्रावरून येत्या १५ जुलैपासून राष्ट्रीय हिंदी वाहिनीचे प्रसारण बंद केले जाणार आहे. यापुढे केवळ या लघु केंद्रावरून मराठी (प्रादेशिक) वाहिनीचेच प्रसारण सुरू राहणार असल्याची माहिती येथील लघु प्रक्षेपण केंद्राचे सहायक अभियंता एस.डी. बनसोड यांनी दिली.
प्रसार भारतीअंतर्गत राज्यात २१ लघु प्रक्षेपण केंद्र कार्यरत आहे. त्यापैकी नांदेड अनुरक्षण केंद्रांतर्गत नांदेडसह पुसद, किनवट व उमरखेड आणि अकोला अनुरक्षण केंद्रांतर्गत येणाºया अकोला, वाशिम, खामगाव, अचलपूर आदी केंद्रांवरून सध्या हिंदी व मराठी या दोन्ही वाहिन्यांचे प्रसारण केले जाते. मात्र प्रसार भारती महानिदेशालयाने १५ जुलैपासून केवळ मराठी वाहिनीचेच प्रक्षेपण करण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यामुळे आता १५ जुलैपासून हिंदी वाहिनीचे प्रक्षेपण बंद केले जाणार आहे. या निर्णयामुळे हिंदी वाहिनीच्या प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

लॉकडाऊनचा असाही लाभ
प्रसार भारतीने राज्यातील दूरदर्शनची २१ लघु प्रक्षेपण केंद्रे ३१ मार्चला बंद करण्याचा आदेश काढला होता. मात्र लॉकडाऊनमुळे त्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. परिणामी राज्यातील ही सर्व केंद्रे पूर्ववत सुरू राहिली.

Web Title: Doordarshan's Marathi channel broadcasts in the state; Hindi broadcast off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार