अडीच लाख बालकांना डोज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 06:00 AM2020-01-19T06:00:00+5:302020-01-19T06:00:11+5:30
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तीन दिवस चार लाख ७२ हजार २४५, तर शहरी भागात पाच दिवस एक लाख १४ हजार ९८२ घरे, अशा एकूण पाच लाख ८७ हजार २२७ घरांना गृहभेटीचे नियोजन आहे. यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात बुथनिहाय नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागात दोन हजार ३५२ आणि शहरी भागात २९०, असे एकूण दोन हजार ४६२ बुथ तयार करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील सुमारे दोन लाख ६५ हजार बालकांना रविवारी पोलिओचा डोज दिला जाणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने तयारी केली आहे.
जिल्ह्यात १९९८ पासून ‘वाईल्ड पोलिओ व्हायरस’ आढळलेला नाही. मात्र तरीही केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार रविवार १९ जानेवारीला जिल्ह्यात पोलिओ निर्मूलन मोहीम राबविली जात आहे. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्यावतीने संपूर्ण जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अपेक्षित दोन लाख आठ हजार ४९९ आणि शहरी भागातील ५६ हजार ७५४, अशा एकूण दोन लाख ६५ हजार २५३ बालकांना पोलिओ लस देण्याचे नियोजन केले आहे. एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये म्हणून आरोग्य विभागाने गृहभेटी केल्या.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तीन दिवस चार लाख ७२ हजार २४५, तर शहरी भागात पाच दिवस एक लाख १४ हजार ९८२ घरे, अशा एकूण पाच लाख ८७ हजार २२७ घरांना गृहभेटीचे नियोजन आहे. यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात बुथनिहाय नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागात दोन हजार ३५२ आणि शहरी भागात २९०, असे एकूण दोन हजार ४६२ बुथ तयार करण्यात येणार आहे. यात प्रत्येकी तीन सदस्य बुथची संख्या एक हजार ३०८, दोन सदस्य बुथची संख्या एक हजार ४०८ आहे. यासाठी परिचारिका, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून एकूण सहा हजार ५९२ मनुष्यबळ वापरले जाणार आहे. गृहभेटीसाठी एक हजार २४३ टीम गठित करण्यात आल्या आहे. यात ग्रामीण भागात एक हजार १२, तर शहरी भागात २३१ टीमचा समावेश आहे. पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेकरिता जिल्ह्यात १८ हजार व्हायल्स, दोन हजार ४५ व्हॅक्सीन कॅरिअर, १० हजार १३६ आईस पॅक्स, १०५ आयएलआर, ११६ डिपफ्रिज, १३१ कोल्ड बॉक्सेस उपलब्ध करून देण्यात आले आहे. ट्रांझिट व मोबाईल टीमचा कृती आराखडासुद्धा तयार करण्यात आला. अतिजोखमेच्या कार्यक्षेत्रासाठी १२३ मोबाईल टीम आहे.
पालकांना आवाहन
रविवार, १९ जानेवारीला जिल्ह्यात पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. सर्व पालकांनी रविवारी आपल्या ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओची लस देऊन या राष्ट्रीय मोहिमेत सहभागी व्हावे व ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.