Maharashtra Election 2019 : "नरेंद्र मोदींच्या काळातच देशाची अधोगती"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 04:56 PM2019-10-12T16:56:32+5:302019-10-12T16:58:31+5:30

नरेंद्र मोदी यांनी मागील निवडणुकीत जनतेला विविध आश्वासने दिली.

"The downfall of the country during Narendra Modi's time" | Maharashtra Election 2019 : "नरेंद्र मोदींच्या काळातच देशाची अधोगती"

Maharashtra Election 2019 : "नरेंद्र मोदींच्या काळातच देशाची अधोगती"

Next

आर्णी : नरेंद्र मोदी यांनी मागील निवडणुकीत जनतेला विविध आश्वासने दिली. मात्र त्यापैकी एकही आश्वासन पूर्ण केले नाही. त्यांच्या काळात देशाची अधोगती झाल्याचा आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी केला. आर्णी येथे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी देशात शेती, उद्योग, सिंचन, रोजगार निर्मिती, आर्थिक बाबी यापैकी कोणत्याही क्षेत्रात भरीव काम झाले नसल्याचा आरोप केला.

राज्यात व देशात भाजपने द्वेषाचे राजकारण सुरू केले आहे. आघाडीच्या नेत्यांची बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. मोदी यांनी याच तालुक्यात दाभडी येथे ‘चाय पे चर्चा’ करताना शेती मालाला दीडपट दर देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच शेतक-यांना नफा मिळवून देण्याची ग्वाही दिली होती. मात्र यापैकी कोणतेही आश्वासने त्यांनी पाळले नाही, असा आरोप वासनिक यांनी केला. भाजपचे नेते काश्मीर व इतर विषयांवर बोलून वेळ मारून नेत आहे. मात्र राज्याच्या विषयावर ते काहीच बोलत नाही.

काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यास शेतकºयांना सरसकट कर्जमाफीसोबतच सुशिक्षित बेरोजगारांना दरमाह पाच हजार रुपये मानधन, विद्यार्थ्यांसाठी शून्य टक्के व्याज दराने कर्ज पुरवठा करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी मंचावर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आर्णीचे काँग्रेस उमेदवार अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, जीवन पाटील, भारत राठोड, जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे, अ‍ॅड. प्रदीप वानखेडे आदी उपस्थित होते. संचालन आरिज बेग तर आभार छोटू देशमुख यांनी मानले. 

पवारांवर हात घालून भाजपने महाराष्ट्राची नाचक्की केली
आर्णी पूर्वी मुकुल वासनिक यांनी उमरखेड येथेही सभा घेतली. सभेत बोलताना ते म्हणाले, शरद पवार यांनी गेली कित्येक वर्ष महाराष्ट्राची सेवा करून देशात राज्याची मान उंचावली. त्याच पवार यांच्या इभ्रतीवर हात घालून भाजप सरकारने राज्याची देशभर नाचक्की केली. तुमच्या सरकारची उपलब्धी काय, असे विचारल्यास आधी तुमचा 60 वर्षांचा हिशेब सांगा, अशी अरेरावीची भाषा वापरून अपयश झाकण्याचा प्रयत्न भाजप करीत असल्याचा आरोप वासनिक यांनी केला. यासभेला काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा, माजी आमदार प्रकाश देवसरकर, माजी आमदार तथा काँग्रेसचे उमेदवार विजय खडसे, माजी सभापती तातू देशमुख, जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते राम देवसरकर आदी उपस्थित होते.

शिवसेनेच्या माजी आमदाराचा काँग्रेस प्रवेश
यासभेत शिवसेना नेते, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस हा केवळ पक्ष नसून एक विचार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस पक्षच सामान्य जनतेला न्याय देऊ शकतो, असेही देवसरकर यांनी स्पष्ट केले.

Web Title: "The downfall of the country during Narendra Modi's time"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.