नाला खोदकामाने शेती उद्ध्वस्त
By admin | Published: July 8, 2017 12:36 AM2017-07-08T00:36:46+5:302017-07-08T00:36:46+5:30
लघुसिंचन प्रकल्प विभागांतर्गत सिमेंट बंधाऱ्यासाठी नाल्याचे खोदकाम करताना यवतमाळ तालुक्यातील माळम्हसोला येथील तीन एकर शेती उद्ध्वस्त झाली आहे.
Next
हिवरी - लघुसिंचन प्रकल्प विभागांतर्गत सिमेंट बंधाऱ्यासाठी नाल्याचे खोदकाम करताना यवतमाळ तालुक्यातील माळम्हसोला येथील तीन एकर शेती उद्ध्वस्त झाली आहे. माती व मुरमाचे ढिगारे टाकण्यात आल्याने शेतकऱ्याला पेरणी करणे कठीण झाले आहे. शेतकरी राजेश बद्रीसिंग चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार खोदकामाची गरज नसताना जेसीबीद्वारे खोदकाम करण्यात आले. तसेच मातीचे ढिगारे शेतात टाकण्यात आले. शेतशिवारातील पावसाचे पाणी त्यांच्या शेतात साचले असून शेत तलावासारखे झाले आहे. या प्रकरणी त्वरित न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा राजेश चव्हाण यांनी दिला आहे.