४१३ गावांमध्ये ठिबक सिंचन

By Admin | Published: October 16, 2015 02:11 AM2015-10-16T02:11:40+5:302015-10-16T02:11:40+5:30

जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात ४१३ गावांची निवड करून ग्रामसभेची मंजुरी घेऊन गाव आराखडा तयार करण्यात आला.

Drip irrigation in 413 villages | ४१३ गावांमध्ये ठिबक सिंचन

४१३ गावांमध्ये ठिबक सिंचन

googlenewsNext

जलयुक्त शिवार अभियान : ८४ हजार ९५१ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता
सुहास सुपासे यवतमाळ
जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात ४१३ गावांची निवड करून ग्रामसभेची मंजुरी घेऊन गाव आराखडा तयार करण्यात आला. पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी या ४१३ गावांमध्ये २७२ हेक्टरवर ठिबक सिंचन तर ३५१४ हेक्टरवर तुषार सिंचन बसविण्यात आले आहे.
जुलै २०१५ अखेर ४१३ गावांपैकी ३०२ गावांमध्ये पूर्ण झालेली कामे दोन हजार ५२३ असून प्रगतीपथावरील कामे १६७ आहेत. एकूण कामांची संख्या दोन हजार ६९० आहेत. लोकसहभाग व शासकीय कामातून पाच लाख ५० हजार घनमिटर गाळ काढण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत सहा कोटी ८८ लाख रुपये आहे. पूर्ण झालेल्या कामातून ८४ हजार ९५१ टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला असून या पूर्णत्वास गेलेल्या कामातून एक लाख ३९ हजार ७०१ हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.
४१३ गावांमध्ये अस्तित्वात असलेले ९१६ सिमेंट नाला बांध व २७ माती नाला बांध आहेत. १०४ जुन्या सिमेंट नाला बांधाची दुरूस्ती झाली असून ३३४ नाला खोलीकरण व सरळीकरणची कामे करण्यात आली आहेत.
२४ मातीनाला बांध दुरुस्तीचे काम करण्यात आले आहेत. ६८ केटीवेअरच्या गेटसाठी महात्मा फुले व भूमी संधारण अभियाना अंतर्गत नियोजन करण्यात आले आहे. ५३.७१ कोटींच्या विशेष निधीतून १७७ साखळी सिमेंट बांधासाठी २८ कोटींचे नियोजन उर्वरित २५.७१ कोटींमधून अनघड दगडी बांध, गॅबियन बंधारे खोल सलग समतल चर व नाला खोलीकरण व सरळीकरण इत्यादी कामे डिसेंबर २०१५ अखेर करण्याचे उदिष्ठ ठेवून पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत निवडलेल्या ४१३ गावांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रत्येक गावामध्ये १५ लाखांचे कामे करून तालुका स्तरावर त्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये शेततळे, ढाळीचे बांध व विहीर पुनर्रभरण कामांचा समावेश आहे. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत वेबसाईट तयार करून त्यावर गाव निहाय माहिती टाकण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत पूर्ण झालेल्या कामांचे मूल्यमापन करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय तंत्र निकेतन, जगदंबा कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, जवाहरलाल दर्डा इन्स्टिटयूट आॅफ इंजिनिअरिंग कॉलेज, भाऊसाहेब नंदुरकर इंजिनिअरिंग, बीएनसीओ इंजिनिअरिंग व साई पॉलिटेक्निक आदींची निवड करण्यात आली आहे.

Web Title: Drip irrigation in 413 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.