उपवनसंरक्षक झाले वाहन चालकाचे सारथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 10:23 PM2018-01-02T22:23:33+5:302018-01-02T22:23:54+5:30

शासकीय अधिकारी म्हटला की, त्याचा रुबाब काही और असतो. आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांपासूनही तो अंतर राखून राहतो. त्यातच चतुर्थ श्रेणी कर्मचारी असेल तर विचारायची सोयच नाही. परंतु पुसद वन विभागात सोमवार आगळावेगळा अनुभव आला.

The driver of the driver was the driver of the vehicle | उपवनसंरक्षक झाले वाहन चालकाचे सारथी

उपवनसंरक्षक झाले वाहन चालकाचे सारथी

Next
ठळक मुद्देपुसद वन विभाग : सेवानिवृत्तनिमित्त आगळावेगळा निरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शासकीय अधिकारी म्हटला की, त्याचा रुबाब काही और असतो. आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांपासूनही तो अंतर राखून राहतो. त्यातच चतुर्थ श्रेणी कर्मचारी असेल तर विचारायची सोयच नाही. परंतु पुसद वन विभागात सोमवार आगळावेगळा अनुभव आला. सेवानिवृत्त झालेल्या चालकाला सत्कार सोहळ्यानंतर स्वत: उपवनसंरक्षकांनी वाहन चालवित चालकाला घरी नेऊन सोडले. हा आगळावेगळा सोहळा पुसदकरांनी ‘याची देही याची डोळा’ अनुभवला.
पुसद वन विभागात वाहन चालक म्हणून कार्यरत असलेले फिरोज खतीब सेवानिवृत्त झालेत. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार सोहळ्याचे आयोजन पुसद उपविभागात करण्यात आले. त्यांनी अनेक अधिकाºयांचे सुरक्षितपणे सारर्थ्य केले. संपूर्ण आयुष्यभर विना अपघात सेवा दिली. अशा या चालकाच्या नोकरीच्या शेवटच्या दिवशी आगळावेगळा गौरव थेट भारतीय वन सेवेचे अधिकारी आणि पुसदचे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांनी केला. शासकीय कार्यालयात सत्कार सोहळा आटोपल्यानंतर स्वत: उपवनसंरक्षक मुंढे यांनी वाहनाचा ताबा घेतला. चालकाला सन्मानाने आपल्या नेहमीच्या जागेवर बसविले आणि चालकाची जागा घेतली उपवनसंरक्षकांनी. सारर्थ्य करीत वाहन चालक फिरोज खतीब यांना त्यांच्या घरी नेऊन सोडले. त्यावेळी घरातील वातावरण अत्यंत भावूक झाले होते.
पुसद वन विभागात झालेल्या सत्कार सोहळ्याला लेखापाल गोपाल कोहरे, लेखापाल उबाळे, कैलास चांडक, लिपिक गोपाल जिरोणकर यांनी मनोगत व्यक्त केले. उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांनीही वाहन चालकाचा गौरव केला. तर फिरोज खतीब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संचालन मुख्य लेखापाल अशोक एंबडवार यांनी तर आभार दिनेश सतदेवे यांनी मानले.

Web Title: The driver of the driver was the driver of the vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.