चालकाला मिळाला ध्वजारोहणाचा मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 10:15 PM2018-01-27T22:15:54+5:302018-01-27T22:16:15+5:30
आपल्या शासकीय निवासस्थानी प्रजासत्ताक दिनी वाहन चालकाला ध्वजारोहणाची संधी देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी वेगळा पायंडा पाडला. शासकीय सेवेतील कनिष्ठांच्या पाठीवर अपवादानेच कौतुकाची थाप पडते.
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : आपल्या शासकीय निवासस्थानी प्रजासत्ताक दिनी वाहन चालकाला ध्वजारोहणाची संधी देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी वेगळा पायंडा पाडला. शासकीय सेवेतील कनिष्ठांच्या पाठीवर अपवादानेच कौतुकाची थाप पडते. अपवादानेच प्रशिस्तीपत्र मिळते. मात्र या प्रजासत्ताक दिनी याहीपेक्षा मोठे काही वाहन चालकाच्या जीवनात घडले.
१२ वर्षापासून जिल्हाधिकाºयांच्या वाहनाचे सारथ्य करणाऱ्या अजय मिश्रा यांना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शासकीय निवासस्थानी ध्वजारोहणाचा बहुमान दिला. अधिकारी-कर्मचाऱ्यात बरेचदा खटके उडतात. त्यात वाहन चालकाला तर कुठेच थारा नसतो. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी ही दरी कमी करीत प्रशासनात राहून नात्यांची गुंफन करता येते, असा आदर्श निर्माण केला आहे.