औषध विक्रेते उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 09:25 PM2018-09-28T21:25:45+5:302018-09-28T21:26:42+5:30
औषधांच्या आॅनलाईन खरेदी-विक्रीला शासनाने मंजुरी दिली. या निर्णयाविरोधात जिल्हाभरातील औषध विक्रेते मेडिकल स्टोअर्स बंद ठेऊन शुक्रवारी रस्त्यावर उतरले होते. त्यांच्या या आंदोलनाला यवतमाळ शहर व जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : औषधांच्या आॅनलाईन खरेदी-विक्रीला शासनाने मंजुरी दिली. या निर्णयाविरोधात जिल्हाभरातील औषध विक्रेते मेडिकल स्टोअर्स बंद ठेऊन शुक्रवारी रस्त्यावर उतरले होते. त्यांच्या या आंदोलनाला यवतमाळ शहर व जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनने आंदोलन पुकारले होते.
यवतमाळ जिल्हा केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनने या आंदोलनाला पाठिंबा देत संपूर्ण जिल्ह्यातील औषधी दुकाने बंद ठेवली. शुक्रवारी दुपारी यवतमाळच्या येरावार चौकातून निषेध रॅली काढण्यात आली. यावेळी संतप्त व्यावसायिकांनी सरकार विरोधात तीव्र घोषणा देत आपल्या भावना व्यक्त केल्या. आॅनलाईन औषधी कंपन्या कोणत्याही जबाबदारीशिवाय औषधांचे आॅर्डर्स मंजूर करत आहेत. औषधी विक्री व वितरण व्यवस्थेत काम करणाऱ्या लाखो युवकांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळणार आहे. बंद दरम्यान गरजू रुग्णांना औषधांची आवश्यकता भासली असता त्यांना असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष पकंज नानवाणी, सचिव संजय बुरले, कोषाध्यक्ष गजानन बट्टावार यांनी तातडीने व्यवस्था उपलब्ध करून दिली. त्यामुळे रुग्णांची गैरसोय टळली.
एमटीपी किट्स, सिल्डेनफिल, टॅडफिल, कोडेन यासारखी गुंगी आणणारी औषधे डॉक्टरांच्या सल्ला न घेता विकण्यात आली.
स्त्रीरोगतज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ या डॉक्टरांनी लिहून दिल्यानंतरच वेळापत्रकानुसार औषधे थेट अपात्र व्यावसायिकांमार्फत पुरविण्यात आली.
जुन्या व बनावट प्रीस्क्रिप्शनवरून औषधांची विक्री अशा एक ना अनेक गंभीर समस्या आॅनलाईन औषधी विक्रीमुळे निर्माण होत आहेत.