बाबासाहेबांमुळेच मानसन्मान मिळाला
By admin | Published: January 11, 2016 02:14 AM2016-01-11T02:14:19+5:302016-01-11T02:14:19+5:30
बुद्धाच्या धम्माची बरोबरी करणारा एकही धर्म जगाच्या पाठीवर नाही. बाबासाहेबांच्या कृपेने जे मोठे झाले,
जोगेंद्र कवाडे : बाभूळगाव येथील धम्म परिषदेचा समारोप
बाभूळगाव : बुद्धाच्या धम्माची बरोबरी करणारा एकही धर्म जगाच्या पाठीवर नाही. बाबासाहेबांच्या कृपेने जे मोठे झाले, ज्यांना मानसन्मान मिळाला, अधिकारी झाले, ज्यांना वैभव प्राप्त झाले, अशा बांधवांनी धम्म परिषदेमध्ये हिरिरीने भाग घेतला पाहिजे, असे मत रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले. शनिवारी येथे धम्म परिषदेच्या समारोपप्रसंगी बोलत होते.
आमदार डॉ.अशोक उईके, विजय डांगे, भाजपाचे तालुकाध्यक्ष सतीश मानलवार, नितीन परडखे, चरणदास इंगोले, मनमोहन भोयर, रवींद्र श्रीरामे, सतीश गडलिंग, रतन गणवीर, दिगांबर गावंडे, शैलेश उके, दत्तूजी नाईक, संजय गावंडे, अमोल कापसे, जयवंत बारसे, सोनू येंडे आदी उपस्थित होते. संविधानाचे महत्त्व सांगताना आमदार कवाडे म्हणाले, ‘बाबासाहेब इस देश का संविधान लिखकर तुने बडा कमाल कर दिया, एक चाय बेचनेवाले को इस देश का पंतप्रधान बना दिया.’
यवतमाळ येथे आदिवासी व दलित बांधवांकरिता स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी केंद्र व्हावे, त्याकरिता आपण मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरणार असल्याचे आमदार डॉ. प्रा.अशोक उईके यांनी सांगितले.
धम्म परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृष्णराव रंगारी यांनी केले. चुडामण मदारे, सुधाकर गडलिंग, विजय डांगे, चरणदास इंगोले आदींची समयोचित भाषणे झाली.
सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. समारोपीय कार्यक्रमप्रसंगी समितीचे अध्यक्ष कृष्णराव रंगारी, चुडामण मदारे, दिलीप वाघमारे, पराग पिसे, सिद्धार्थ दातार, विनायक माहुरे, पद्माकर जाधव, गौतम लांडगे, राहुल विहिरे, हरिदास दातार, टी.एस. इखार, प्रेमदास वंजारी, भाऊ मनवर, संजय तिरपुडे, शोभाताई पिसे, रेशमा उके, कमलाताई रंगारी, सुरेंद्र बिंदोड, गणेश काळबांधे, उत्तमराव दिघाडे, दिलीप शेंडे, बाबाराव अलोणे व मोठ्या संख्येने उपासक, उपासिका, परिसरातील नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन दिलीप वाघमारे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार पद्माकर जाधव यांनी मानले.
(प्रतिनिधी)