बॉम्बच्या भीतीने पुसद हादरले

By admin | Published: January 26, 2017 01:02 AM2017-01-26T01:02:00+5:302017-01-26T01:02:00+5:30

गजबजलेला सुभाष चौक. वेळ सकाळी ११.३० ची. अचानक श्वान पथक, बॉम्ब शोधक, नाशक पथक, दंगल नियंत्रण पथक येऊन धडकले.

Due to the fear of the bomb shook | बॉम्बच्या भीतीने पुसद हादरले

बॉम्बच्या भीतीने पुसद हादरले

Next

मॉक ड्रील: श्वान पथक, बॉम्ब शोधक पथक व पोलिसांचा गराडा
पुसद : गजबजलेला सुभाष चौक. वेळ सकाळी ११.३० ची. अचानक श्वान पथक, बॉम्ब शोधक, नाशक पथक, दंगल नियंत्रण पथक येऊन धडकले. सुभाष चौकात बॉम्ब असल्याची वार्ता शहरभर पसरली. वरिष्ठ पोलीस अधिकारीही तेथे दाखल झाले. मात्र काही वेळातच ही पोलिसांची मॉक ड्रिल असल्याचे पुढे आले आणि पुसदकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुसद शहरातील गजबजलेल्या सुभाष चौकात पोलिसांची मॉक ड्रिल झाली. बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळताच यवतमाळ येथील बॉम्ब शोधक व नाशक पथक, दंगा नियंत्रण पत्रक, जलद कृती दलासह ५० च्यावर पोलिसांनी या चौकाला वेढा घातला. बॉम्बचा शोध सुरू झाला. नेमके काय झाले, हे कुणालाही कळत नव्हते. त्यामुळे बघ्यांची गर्दी वाढत होती. कुणी तरी बॉम्ब असल्याचे सांगितले. ही वार्ता शहरभर पसरली. अनेकांची यामुळे पाचावर धारण बसली. अखेर बॉम्ब शोधक पथकाने श्वानाच्या मदतीने ‘बॉम्ब’ शोधून काढला. लोहार लाईनमध्ये जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका प्रवासी बॅगमध्ये बॉम्ब ठेवलेला होता.
पोलिसांची मॉक ड्रिल असल्याचे माहीत झाल्यानंतर अनेकजण परतले. परंतु तोपर्यंत तेथे उपस्थितांच्या अंगावर काटा उभा राहिला होता. शहरात याच वेळात विविध तर्कवितर्क लावले जात होते. कुणी भांडण तर कुणी तणाव झाल्याचे सांगत होते. शहरात मॅसेजही फिरायला लागले होते. परंतु काही वेळातच ही कारवाई म्हणजे सरावाचा भाग असल्याचे सांगितले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय बन्सल (आयपीएस), शहर ठाणेदार वाघू खिल्लारे, ग्रामीण ठाणेदार धनंजय जगदाळे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

 

Web Title: Due to the fear of the bomb shook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.