दिग्रस पालिकेवर पूरग्रस्तांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 11:41 PM2018-07-10T23:41:00+5:302018-07-10T23:42:40+5:30

सतत १३ वर्षांपासून घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या पूरग्रस्तांनी प्रहारच्या नेतृत्वात सोमवारी नगरपरिषदेवर धडक देऊन राडा केला. त्यांनी त्वरित घरकूल देण्याची मागणी केली. गेल्या १३ वर्षांपूर्वी धावंडा नदीला महापूर आला होता.

Due to the floods hit by Digras municipal corporation | दिग्रस पालिकेवर पूरग्रस्तांची धडक

दिग्रस पालिकेवर पूरग्रस्तांची धडक

Next
ठळक मुद्देभ्रष्टाचारावर प्रहार : १३ वर्षांपासून घरकुलाची केवळ प्रतीक्षाच

लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : सतत १३ वर्षांपासून घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या पूरग्रस्तांनी प्रहारच्या नेतृत्वात सोमवारी नगरपरिषदेवर धडक देऊन राडा केला. त्यांनी त्वरित घरकूल देण्याची मागणी केली.
गेल्या १३ वर्षांपूर्वी धावंडा नदीला महापूर आला होता. या महापुरामुळे नगरपरिषदेच्या मालकीचे नांदगव्हाण धरण फुटून धरणाचे पाणी गावात शिरले होते. यात बेसावध असलेल्या नदी काठावरील काहींचे बळी गेले होते. तब्बल ९५२ कुटुंबियांचे संसार एका क्षणात उध्वस्त झाले होते. या घटनेने त्यांचे सर्वस्व हिरावून घेतले होते. नंतर लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासनाने त्यांना घरकूल बांधन देण्याची ग्वाही दिली होती. त्याला आता १३ वर्षे लोटली आहे. मात्र अद्याप पूरग्रस्तांना घरकूल मिळाले नही.
पूरग्रस्तांच्या घरकुलांचे कामे सुरू आहे. मात्र कामाच धीमी गती आहे. सोबतच बांधकाम निकृष्ट होत असल्याचा आरोप आहे. याचा निषेध महणून सोमवारी प्रहार संघटनेचे प्रमोद कुदळे यांच्या नेतृत्वात पूरग्रस्तांनी नगरपरिषदेवर धडक दिली. येथील गजानन हाडके यांच्या पुढाकारात धावंडा नदी काठच्या लोकांनी मोर्चा काढला. मोर्चाने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. या निवेदनातून घरकूल पूर्ण करण्यासह विविध मागण्या करण्यात आल्या.
४०० घरकुलांचे बांधकाम पूर्ण
‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांनी सीओ शेषराव टाले यांना ९५२ पूरग्रस्तांच्या घरकुल प्रकल्पाची विचारपूस केली. टाले यांनी ४०० घरांचे बांधकाम परीक्षण करुन ते पूरग्रस्तांच्या स्वाधीन करु व इतरांना पंतप्रधान घरकूल योजनेअंतर्गत घरकूल बांधून देण्याचे आश्वासन दिले. मात्र २५ हजार रूपये भरा व घराचा ताबा घ्या, अशी अट पालिकेने घातली. यामुळे मोर्चेकरी सीओंमध्ये चकमक उडाली होती. आता ही समस्या प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्या दरबारात पोहोचणार आहे.

Web Title: Due to the floods hit by Digras municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Morchaमोर्चा