जीएसटीमुळे बाजार समितींची खरेदी बंद

By admin | Published: July 3, 2017 01:57 AM2017-07-03T01:57:36+5:302017-07-03T01:57:36+5:30

संपूर्ण देशभरात एकच कर प्रणाली म्हणून जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाली. या कर प्रणालीमुळे बाजार

Due to GST, the purchase of market committees is closed | जीएसटीमुळे बाजार समितींची खरेदी बंद

जीएसटीमुळे बाजार समितींची खरेदी बंद

Next

मंडी टॅक्सला विरोध : ट्रान्सपोर्टधारकांकडे जीएसटी नंबरच नाही, कोट्यवधींची उलाढाल ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : संपूर्ण देशभरात एकच कर प्रणाली म्हणून जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाली. या कर प्रणालीमुळे बाजार समित्यांपुढे अडचणी निर्माण झाल्याने जिल्ह्यातील बाजार समित्यांनी शेतमालाची खरेदी बंद केली. पुढील चार दिवस हा बंद कायम राहणार आहे.
देशात शनिवारपासून जीएसटीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. या अंमलबजावणीपूर्वी यवतमाळ येथे व्यापारी व नागरिकांच्या माहितीसाठी जीएसटी संदर्भात कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेनंतरही व्यापाऱ्यांचे अनेक प्रश्न अद्याप कायम आहेत. त्याचा थेट परिणाम शेतमालाची खरेदी करणाऱ्या धान्य बाजारावरही झाला आहे.
खरेदी केलेले धान्य पाठविताना ट्रान्सपोर्ट केले जाते. या ट्रान्सपोर्ट करणाऱ्यांकडे जीएसटी नंबरच नाही. यामुळे धान्याची उलाढालच अडचणीत सापडली आहे. हा गुंता सोडविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर बैठक बोलावण्यात आली नाही. कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शनही करण्यात आले नाही. आता हा गुंता सुटल्यानंतरच धान्य बाजारातील खरेदी सुरू होणार आहे.
धान्य खरेदी करताना ‘मंडी टॅक्स’ आकारण्यात आला आहे. यामुळे व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांना त्याचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. व्यापाऱ्यांनी मंडी टॅक्स झिरो करण्याची मागणी केली आहे. जीएसटीमुळे मंडी टॅक्स १.०५ पैसे करण्यात आला. हा टॅक्स व्यापाऱ्यांसोबतच शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा असल्याचा आरोप व्यापारी करीत आहे. हा टॅक्स इतर टॅक्सप्रमाणे झिरो करावा, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे.

सोयाबीन खरेदीवर कर
सोयाबीनच्या खरेदीवर जीएसटी आकारण्यात आला. यामुळे प्लान्ट मालकांनी सध्या सोयाबीनची खरेदी थांबविली आहे. यातील तोडगा काढण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. हा गुंता येत्या तीन ते चार दिवसात सुटण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.

जीएसटीच्या अंमलबजावणीसोबत बाजार समितीमध्ये विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत. हा गुंता सोडविण्यासासोबत जीएसटी समजून घेण्यासाठी बाजार समित्यांनी बंद पुकारला आहे.
- विजय मुंधडा,
संचालक, बाजार समिती

Web Title: Due to GST, the purchase of market committees is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.