पावसाच्या मुक्कामाने घरादारांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 10:30 PM2018-08-17T22:30:51+5:302018-08-17T22:31:22+5:30

महिनाभराच्या विश्रांतीनंतर बुधवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने जिल्हा आनंदाने भिजला होता. मात्र पावसाचा मुक्काम शुक्रवारी रात्रीपर्यंत वाढल्याने माणसे बेघर झाली. आर्णी, दिग्रस, दारव्हा शहरात पुराचा वेढा पडला. उमरखेड, घाटंजी, पांढरकवडा, नेर, महागाव तालुक्यांमध्ये हजारो हेक्टर पीक पाण्याखाली आले.

Due to the rains in the house damage to the house | पावसाच्या मुक्कामाने घरादारांचे नुकसान

पावसाच्या मुक्कामाने घरादारांचे नुकसान

Next
ठळक मुद्देसहा तालुक्यात अतिवृष्टी : हजार घरांची पडझड, आर्णी, दिग्रसला पुराचा वेढा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महिनाभराच्या विश्रांतीनंतर बुधवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने जिल्हा आनंदाने भिजला होता. मात्र पावसाचा मुक्काम शुक्रवारी रात्रीपर्यंत वाढल्याने माणसे बेघर झाली. आर्णी, दिग्रस, दारव्हा शहरात पुराचा वेढा पडला. उमरखेड, घाटंजी, पांढरकवडा, नेर, महागाव तालुक्यांमध्ये हजारो हेक्टर पीक पाण्याखाली आले.
तर जिल्ह्यात बाजीराव डेरे रा. धानोरा आणि अंकुश साबळे रा. सुकळी या दोघांचा बुडून मृत्यू झाला.
दिग्रस तालुक्यात सर्वाधिक १३४, आर्णी १२७, दारव्हा ९२, पुसद १०६, उमरखेड ८६, महागाव ८३ मिमी पावसाची नोंद झाली. दिग्रसमध्ये पुरात अडकलेल्या ३०० प्रवाशांना प्रशासनाने तहसील कार्यालयात निवास आणि भोजनाची व्यवस्था केली. संततधार पावसामुळे जिल्ह्यात ९३७ घरांची पडझड झाली आहे. त्यात उमरखेड १००, महागाव २५१, दिग्रस ४००, पांढरकवडा ७३, पुसद ८४, यवतमाळ २३, घाटंजी तालुक्यात सहा घरे पडली. दरम्यान पुरामुळे दिग्रसमध्ये २२, यवतमाळ एक तर पुसद तालुक्यात सहा अशी २९ जनावरे वाहून गेली. तर दारव्हा तालुक्यात मात्र तब्बल १९४ जनावरांचा मृत्यू झाला.
सुरुवातीला पिकांना संजीवनी देणारा पाऊस शुक्रवारी पिकांचा कर्दनकाळ ठरला. जवळपास तीन हजार हेक्टरवरील शेत पिके वाहून गेली. यात घाटंजी तालुक्यात सर्वाधिक दोन हजार हेक्टर, पांढरकवडा ३५९, पुसद ७९४ तर दारव्हा तालुक्यात १३९ हेक्टरवर नुकसान झाले. जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांचा जलसाठा वाढला आहे. बेंबळा ५०.७१, निम्न वर्धा २६.५२, अधरपूस ८२.५२, अरुणावती ७७.२३, अपर पैनगंगा ३८.१५, अडाण प्रकल्प ८६.३७ टक्के भरला आहे. अडाण प्रकल्पाचे पाच आणि अधर पूस प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

Web Title: Due to the rains in the house damage to the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.