‘संस्काराचे मोती’मुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 10:15 PM2018-02-04T22:15:33+5:302018-02-04T22:15:50+5:30
समाजातील सर्वच क्षेत्रामध्ये मुली मुलांची बरोबरी करत आहेत. शिक्षण क्षेत्रात मात्र मुलींचाच दबदबा असून त्यांनी विविध स्पर्धा व परीक्षेच्या माध्यमातून स्वत:ला सिद्ध केले आहे. लोकमत समूह फार मोठा असून त्यांच्यामार्फत राबविली जाणारी संस्काराची मोती स्पर्धा अतिशय उपयुक्त व स्तुत्य उपक्रम आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बाभूळगाव : समाजातील सर्वच क्षेत्रामध्ये मुली मुलांची बरोबरी करत आहेत. शिक्षण क्षेत्रात मात्र मुलींचाच दबदबा असून त्यांनी विविध स्पर्धा व परीक्षेच्या माध्यमातून स्वत:ला सिद्ध केले आहे. लोकमत समूह फार मोठा असून त्यांच्यामार्फत राबविली जाणारी संस्काराची मोती स्पर्धा अतिशय उपयुक्त व स्तुत्य उपक्रम आहे. यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांना लाभ होतो, असे प्रतिपादन तहसीलदार दिलीप झाडे यांनी केले. ते बाभूळगाव येथील प्रताप विद्यालयात स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात बोलत होते.
यावेळी संस्थेचे सहसचिव प्रकाशचंद छाजेड, मुख्याध्यापिका एस.बी. भारंबे, शिवशक्ती महाविद्यालयाचे संचालिक प्रवीण तातेड, उपमुख्याध्यापक आनंद मेश्राम, लोकमतचे प्रतिनिधी आरिफ अली उपस्थित होते. स्पर्धेतील प्रथम बक्षीस इयत्ता ७ (अ) चा विद्यार्थी पवन सुरेशराव हिवरकर याने प्राप्त केले. द्वितीय प्रसन्न विठ्ठल मडावी (वर्ग ६ क), तृतीय आनंद गणेश गुप्ता (वर्ग ८ ड) यांनी प्राप्त केले. या शिवाय स्पर्धेत सहभागी झालेल्या ८३ विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र व बॉक्सचे वितरण करण्यात आले. उपस्थितांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
संचालन संजय भितकर यांनी तर प्रास्ताविक व आभार लोकमत प्रतिनिधी आरिफ अली यांनी मानले. यावेळी विजय निकम, एस.पी. गजबे, ए.ए. काशीकर, एस.एल. बेंडे, राम चिकणकर, ए.डब्ल्यू. महाजन, सी.बी. कोरडे, एस.एम. शेळके, ए.व्ही. पवार, सादीक शेख, बी.बी. जाधव, ज्योती गिरी, डी.एस. वडते, आर.एम. मेश्राम आदी उपस्थित होते.