ट्रकने चिरडल्याने ट्रॅफिक पोलिसाचा जागीच मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2018 12:35 PM2018-04-03T12:35:44+5:302018-04-03T12:35:44+5:30

भरधाव ट्रकने चिरडल्याने ट्रॅफिक पोलिसाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना यवतमाळ येथे घडली आहे.

Due to the truck crash, the traffic police died on the spot | ट्रकने चिरडल्याने ट्रॅफिक पोलिसाचा जागीच मृत्यू 

ट्रकने चिरडल्याने ट्रॅफिक पोलिसाचा जागीच मृत्यू 

Next

यवतमाळ : भरधाव ट्रकने चिरडल्याने ट्रॅफिक पोलिसाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना यवतमाळ येथे घडली आहे. यवतमाळमधील कळंब बायपासवर मंगळवारी ( 3 एप्रिल) सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बाईकनं ट्रकचा पाठलाग करत असताना सय्यद करीमोद्दीन (वय 50 वर्ष) यांचा मृत्यू झाला आहे. 

करीमोद्दीन हे यवतमाळच्या जिल्हा वाहतूक शाखेत कार्यरत होते. मंगळवारी सकाळी कळंब बायपासवर कर्तव्य बजावत असताना एक ट्रक हात दाखवूनही थांबला नाही. त्यामुळे सय्यद करीमोद्दीनने आपल्या बाईकने त्याचा पाठलाग केला. बाईक ट्रकच्या पुढे काढण्याच्या प्रयत्नात ते ट्रकच्या चाकाखाली आले. डोक्यावरूनच ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: Due to the truck crash, the traffic police died on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात