जलसंधारणामुळे शेती झाली उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:12 AM2019-01-31T00:12:08+5:302019-01-31T00:12:33+5:30

घाटंजी तालुक्यातील सावरगाव मंगी येथे जलसंधारण विभागामार्फत खोदकाम सुरू आहे. या विभागाने कोणतेही नियोजन न करता व स्थानिक शेतकऱ्यांना सूचना न देता खोदकाम केले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून रबीच्या हंगामातील पिके धोक्यात आली.

Due to water conservation, farming was destroyed | जलसंधारणामुळे शेती झाली उद्ध्वस्त

जलसंधारणामुळे शेती झाली उद्ध्वस्त

Next
ठळक मुद्देसावरगाव मंगी : शेतकऱ्यांवर कोसळले संकट

अब्दुल मतीन ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पारवा : घाटंजी तालुक्यातील सावरगाव मंगी येथे जलसंधारण विभागामार्फत खोदकाम सुरू आहे. या विभागाने कोणतेही नियोजन न करता व स्थानिक शेतकऱ्यांना सूचना न देता खोदकाम केले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून रबीच्या हंगामातील पिके धोक्यात आली.
सावरगाव मंगी येथील रामराव चौधरी, भाऊराव चौधरी, वामन चौधरी, कमल चौधरी या शेतकऱ्यांच्या शेत गट नं. १६३/१ मध्ये जलसंधारण विभागाने मनमानीपणे खोदकाम सुरू केले. त्याची पूर्वसूचना दिली नाही. यामुळे शेताला लावलेले तार कुंपन नष्ट झाले. शिवाय या भागातील शेतकऱ्यांनी सिंचनाकरिता पाईप लाईन टाकली होती. या खोदकामात संपूर्ण पाईप लाईनही फुटली आहे. सुमारे ३५ पाईप उखडले गेले. ऐन हंगामात शेतशिवारात जेसीबी फिरविल्याने सोयाबीन, गहू, हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले.
सिंचनाची सोय नसल्याने गहू, हरभरा आता वाळण्याच्या मार्गावर आहे. उपविभागीय अभियंत्यांनी हे काम करताना स्थानिक शेतकºयांना सूचना दिल्या नाही. त्यामुळे नेमके खोदकाम कुठे करायचे हे लक्षात न येता शेताच्या बांधावर, तर काही ठिकाणी मधोमध खोदकाम केले. यामुळे आता जमीन पडिक राहण्याची स्थिती निर्माण झाली. तातडीने कारवाई करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी या शेतकºयांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Web Title: Due to water conservation, farming was destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.