पाण्यासाठी दारव्हा पालिकेवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 09:48 PM2018-10-24T21:48:13+5:302018-10-24T21:48:52+5:30

येथील वार्ड क्रमांक १४-१५ मध्ये सतत अनियमित पाणीपुरवठा होत असून वैतागलेल्या नागरिकांनी बुधवारी नगरपरिषदेवर धडक दिली. त्यांनी येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा नियमित करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

Due to water water strikes | पाण्यासाठी दारव्हा पालिकेवर धडक

पाण्यासाठी दारव्हा पालिकेवर धडक

Next
ठळक मुद्देमहिला संतप्त : समस्या न सुटल्यास आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : येथील वार्ड क्रमांक १४-१५ मध्ये सतत अनियमित पाणीपुरवठा होत असून वैतागलेल्या नागरिकांनी बुधवारी नगरपरिषदेवर धडक दिली. त्यांनी येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा नियमित करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
शहरातील तेलीपुरा, मेनलाईन यासह आजूबाजूच्या परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून नगरपालिकेमार्फत होणारा पाणीपुरवठा अनियमित आहे. महिन्यातून एक किंवा दोन दिवस १५ मिनिटांकरिता पाणीपुरवठा होतो, अशी तक्रार आहे. या संदर्भात अनेकदा सांगूनही पाणी मिळत नसल्याने बुधवारी या परिसरातील महिला, पुरुषांनी पाण्याचे रीकामे गुंड घेऊन नगरपरिषदेवर धडक दिली. यावेळी मुख्याधिकारी कार्यालयात नसल्याने नगराध्यक्षांना निवेदन देण्यात आले.
येत्या दोन दिवसात या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला. निवेदन देताना शाहीद अहेमद मु.बशारत, मो.इसराईल मो इस्माईल, निर्बाण, राजू चव्हाण, मंगेश गुल्हाने, वासुदेव चव्हाण, गजानन पोळकर, रुतीक वानखडे, शुभा चौधरी, मुंगसाजी चौधरी, प्रमिला गेडाम, नितीन कोरडे, राजेश झाडे, दिनेश चव्हाण आदी उपस्थित होते.
‘सीओं’च्या खुर्चीवर गुंड ठेवून घातला हार
नागरिक पालिकेवर धडकले, तेव्हा सीओ उपस्थित नव्हते. त्यामुळे संतप्त महिला, पुरुषांनी त्यांच्या खुर्चीवर रिकामे गुंड ठेवून निषेध नोंदविला. नागरिकांनी विविध घोषणाही दिल्या. उन्हाळा तर दूरच हिवाळ्यापूर्वीच पाणीटचाईचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला.

Web Title: Due to water water strikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.