दिग्रसमध्ये तूर खरेदी ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:06 AM2018-05-13T00:06:35+5:302018-05-13T00:06:35+5:30

गेल्या महिनाभरापासून शासकीय तूर खरेदी ठप्प पडल्याने येथील बाजार समितीत शेतकऱ्यांचे हाल होत आहे. महिनाभरापासून येथील शासकीय तूर खरेदी ठप्प झाली आहे. तालुक्यातील अडीच हजार शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली होती.

Dump purchases of tur | दिग्रसमध्ये तूर खरेदी ठप्प

दिग्रसमध्ये तूर खरेदी ठप्प

Next
ठळक मुद्देबाजार समितीचे दुर्लक्ष : अडीच हजार शेतकऱ्यांची नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : गेल्या महिनाभरापासून शासकीय तूर खरेदी ठप्प पडल्याने येथील बाजार समितीत शेतकऱ्यांचे हाल होत आहे.
महिनाभरापासून येथील शासकीय तूर खरेदी ठप्प झाली आहे. तालुक्यातील अडीच हजार शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली होती. विदर्भ मार्केटिंग फेडरेशनच्या अखत्यारीत शासकीय तूर खरेदी २२ फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. मात्र नाफेडकडे तूर साठविण्यासाठी जागा नसल्याने गेल्या महिनाभरापासून ही खरेदी बंद पडली आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नाफेडचे तूर खरेदी केंद्र केवळ २६ दिवस सुरू होते. आतापर्यंत अडीच हजार पैकी केवळ ७८२ शेतकऱ्यांकडून १२ हजार ४१२ क्ंिवटल तूर खरेदी करण्यात आली. उर्वरित शेतकरी अद्याप तूर विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे आॅनलाईन नोंदणीची प्रतीक्षा यादी प्रकाशित केली जात नसल्याने शेतकऱ्यांना तूर विक्रीसाठी कोणत्या दिवशी केंद्रावर जावे याची माहिती मिळत नाही. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. आॅनलाईन नोंदणीतही गैरप्रकार होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे.
शेतकरी आंदोलनाच्या तयारीत
तालुक्यातील शेतकरी त्रस्त झाले असताना बाजार समिती मात्र सुस्त दिसून येत आहे. सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने प्रत्येकालाच पैशाची गरज आहे. त्यामुळे अनेक शेतकरी खुल्या बाजारात कवडीमोल दरात आपली तूर विकत आहे. शासकीय तूर खरेदी सुरू न झाल्यास तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.

Web Title: Dump purchases of tur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.