अडचणीच्या काळात दिल्लीची नाय, गल्लीची बाय कामी येते - वैशाली येडे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 05:51 PM2019-01-11T17:51:26+5:302019-01-11T17:55:33+5:30
पुढच्या जन्मी अदानी, अंबानी होईन असे वाटून पतीने आत्महत्या केली, असे वैशाली यांचे वक्तव्य ऐकून सारेच हेलावले.
यवतमाळ : अडचणीच्या काळात दिल्लीची नाय , गल्लीची बाय कामी येते असे म्हणत आत्महत्या केलेल्या शेतकरी सुधाकर येडे यांच्या पत्नीने ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनात मनोगत व्यक्त केले. माझा या जन्मावर विश्वास आहे त्यामुळे मी रडत नाय तर लढतेय असे त्यांनी म्हटले.
पुढच्या जन्मी अदानी, अंबानी होईन असे वाटून पतीने आत्महत्या केली खरी पण मी हीच वायद्याची शेती, माझ्या हिमतीवर फायद्याची करून दाखवणार हा विश्वास आहे असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. या व्यवस्थेने माझ्या पतीचा बळी घेतला असे परखड शब्दात सांगून जगरहाटीने विधवापण लादल्याचे अधोरेखित केले.
या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सांगू इच्छिते की, लेखक आणि कष्टकरी सारखेच आहेत. दोघांनाही भाव मिळत नाही. मात्र संमेलनाच्या निमित्ताने अ भावाने जगणाऱ्याला भाव मिळेल ही आशा व्यक्त करते.
आज शुक्रवार दिनांक.११ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ८ वाजता यवतमाळ येथे आयोजित ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा प्रारंभ ग्रंथ दिंडीद्वारे करण्यात आला.आझाद मैदान ते संमेलन स्थळी दिंडीची मिरवणूक निघाली .या दिंडीत साहित्यिक प्रेमींचा व नागरिकांचा मोठा सहभाग लाभला. pic.twitter.com/V3PggCF4r0
— Madan Yerawar (@Madan_Yerawar) January 11, 2019