13 हजार हेक्टरवरील धूळ पेरणी धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2022 05:00 AM2022-06-13T05:00:00+5:302022-06-13T05:00:15+5:30

जिल्ह्यात यावर्षी नऊ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार आहे. त्या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले. मात्र, अद्याप पेरणी योग्य पाऊस झाला नाही. याच  स्थितीत काही शेतकऱ्यांनी मोठी रिस्क स्वीकारून कपाशीची लागवड केली. तब्बल १३ हजार ८०० हेक्टरवर धूळ पेरणी झाली आहे. आता पावसाची नितांत आवश्यकता आहे. मात्र पाऊस सतत लांबत आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहे.

Dust sowing on 13 thousand hectares in danger | 13 हजार हेक्टरवरील धूळ पेरणी धोक्यात

13 हजार हेक्टरवरील धूळ पेरणी धोक्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : हवामान विभागाने यावर्षी वेळेपूर्वीच मान्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला आणि शेतकरी पेरणीला लागले. पाऊस बरसायच्या आधीच १३ हजार ८०० हेक्टरवर शेतकऱ्यांनी धूळ पेरणी आटोपली. आता पावसाची नितांत आवश्यकता आहे. मात्र पाऊस लांबला. त्यामुळे धूळ पेरणी उलटण्याचा धाेका वाढला आहे. 
जिल्ह्यात यावर्षी नऊ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार आहे. त्या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले. मात्र, अद्याप पेरणी योग्य पाऊस झाला नाही. याच  स्थितीत काही शेतकऱ्यांनी मोठी रिस्क स्वीकारून कपाशीची लागवड केली. तब्बल १३ हजार ८०० हेक्टरवर धूळ पेरणी झाली आहे. आता पावसाची नितांत आवश्यकता आहे. मात्र पाऊस सतत लांबत आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहे.
विजेच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, वीजही अनेक भागात गूल राहात असल्याने ओलिताची सोय उरली नाही. अनेक शेतकऱ्यांना अर्धवट पाणी देता आले आहे. अपुऱ्या पाण्यात कपाशीचे बियाणे अंकुरले. मात्र, आता पावसाअभावी कोंब पिवळे पडत आहेत.  यातून शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याचा धोका आहे. मान्सूनची आगेकूच संथगतीने असल्याने अजूनही १०० मि.मी. पाऊस झाला नाही. अशा स्थितीत पेरणी उलटण्याचा धोका वाढला आहे. पुसद, उमरखेड, दिग्रस, यवतमाळ,  दारव्हा, आर्णी, राळेगाव, पांढरकवडा आणि घाटंजी तालुक्यात कापसाची लागवड केली आहे. 

हवामान विभागाच्या अंदाजाने घात
- गतवर्षी हवामान विभागाचा अंदाज तंतोतंत खरा ठरला होता. यामुळे यंदा शेतकऱ्यांनी पेरणीची घाई केली. काही शेतकऱ्यांनी एकरी उत्पन्न वाढावे म्हणून लवकर टोबणी केली. काहींनी मजूर टंचाईवर मात करण्यासाठी धावपळ केली. ही संपूर्ण घाई शेतकऱ्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी १०० मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच खरिपाची पेरणी करावी. अधिक घाई झाली, तर त्याचा विपरित परिणाम होईल. शेतकऱ्यांनी पाऊस बरसल्यानंतरच पेरणी करावी.
 - नवनाथ कोळपकर, कृषी अधीक्षक, यवतमाळ

 

Web Title: Dust sowing on 13 thousand hectares in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.