वणीत डेंग्यूसदृश आजार अनियंत्रित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 10:31 PM2018-10-30T22:31:08+5:302018-10-30T22:31:31+5:30

वणी शहरात गेल्या एक महिन्यांपासून डेंग्यसदृश्य आजाराचे अक्षरश: थैमान सुरू आहे. शहरातील प्रत्येक वॉर्डात या आजाराने बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Dynasty Disease Unregulated | वणीत डेंग्यूसदृश आजार अनियंत्रित

वणीत डेंग्यूसदृश आजार अनियंत्रित

Next
ठळक मुद्देएका वॉर्डात २० रूग्ण : नियमित फवारणी होत नसल्याचा नागरिकांचा आरोप

म.आसिफ शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वणी शहरात गेल्या एक महिन्यांपासून डेंग्यसदृश्य आजाराचे अक्षरश: थैमान सुरू आहे. शहरातील प्रत्येक वॉर्डात या आजाराने बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मारेगाव तालुक्यातील हिवरी येथे अशाच आजाराने दोघांचा मृत्यू झाल्याने वणी उपविभागात मृतांची संख्या आता तीन झाली आहे.
यापूर्वी वणी शहरात १३ आॅक्टोबरला एका शाळकरी मुलीचा डेंग्यूसदृश्य आजाराने मृत्यू झाला होता, हे विशेष. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची बाब लक्षात आल्यानंतर वणीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास कांबळे यांनी वणी नगरपालिकेला पत्र लिहून शहरात फवारणी करण्याच्या सूचना केल्या. त्यावरून नगरपालिकेने शहरात फवारणी सुरू केल्याचा दावा केला असला तरी समाधानकारकरित्या फवारणी होत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमान घसरल्याने रात्रीच्यावेळी नागरिक बोचऱ्या थंडीचा अनुभव घेत आहे. या वातावरणामुळे डासांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यातूनच डेंग्यूसदृश्य आजारात वाढ झाल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. एकीकडे शहरात डेंग्यूसदृश्य आजाराचे थैमान असताना नगरपालिकेचा आरोग्य विभाग मात्र अद्यापही निद्रावस्थेत असल्याचा गंभीर आरोप प्रहारचे उपजिल्हा प्रमुख अखिल सातोकर यांनी केला आहे. शहरातील आरोग्य व्यवस्थेवर खर्च करण्यासाठी पालिकेला मोठा निधी येतो. परंतु या निधीचे काय होते, हे कुणालाही कळत नाही. आज वणी शहरातील आरोग्याची स्थिती अतिशय बिकट असताना आरोग्य विभागाने ही स्थिती बेदखल करणे, ही अतिशय दुर्दैवी बाब असल्याचे सातोकर म्हणाले.
शहरातील आरोग्याची परिस्थिती लक्षात घेता, ज्या प्रमाणात फॉगींग मशिनने फवारणी करायला हवी, त्या प्रमाणात केलीच जात नसल्याने दिवसेंदिवस डेंग्यूसदृश्य रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शासकीय रूग्णालयांमध्ये या आजारावर उपचारासाठी आवश्यक असलेली व्यवस्था नसल्याने सामान्य गरिब रूग्णांना खासगी रूग्णालयाकडे धाव घ्यावी लागत आहे.
शहरातील देशमुखवाडीतील एका अतिशय सामान्य गरिब रूग्णाला या आजाराची बाधा झाली. त्याला उपचारासाठी वणीतील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. सुटी झाली तेव्हा त्याची हाती तब्बल ३७ हजारांचे बिल देण्यात आले. अनेक रूग्णांना असाच भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे शासकीय रूग्णालयात उपचाराची सोय करण्याची मागणी आहे.
रूग्णांच्या नातलगांकडून गावठी उपचारावर भर
डेंग्यूसदृश्य आजाराने शेकडो रूग्ण बाधित आहे. त्यामुळे शहरातील खासगी रूग्णालय रूग्णांच्या गर्दीने फुलून गेली आहेत. अनेक रूग्णांचे नातेवाईक या आजारावर उपचार म्हणून गावठी उपचार करीत आहे. पपईच्या पानाचा रस या आजारावर उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: Dynasty Disease Unregulated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.