‘अमृत’चे ई-भूमिपूजन
By admin | Published: April 12, 2017 12:07 AM2017-04-12T00:07:23+5:302017-04-12T00:07:23+5:30
अमृत पाणीपुरवठा योजनेचे ई-भूमिपूजन १३ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
यवतमाळ : अमृत पाणीपुरवठा योजनेचे ई-भूमिपूजन १३ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण नगरपरिषदेत केले जाणार आहे. यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन पालकमंत्री मदन येरावार यांनी नगरपरिषदेत घेतलेल्या बैठकीत केले. केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानात शहराचा समावेश झाला आहे. या अंतर्गत पाणीपुरवठ्यासाठी ३०२ कोटी रुपये मंजूर झाले आहे. या योजनेच्या माध्यमातून शहराला २४ तास पाणीपुरवठा होणार आहे. या योजनेसाठी बेंबळा प्रकल्पातून पाणी आणण्यात येणार असून ५४५ किलोमीटरपर्यंत पाईपलाईन टाकली जाणार आहे. ४ मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प साकारला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या बैठकीला नगराध्यक्ष कांचन चौधरी, उपाध्यक्ष सुभाष राय, सभापती नितीन गिरी, सुषमा राऊत, रिताताई धावतोडे, मुख्याधिकारी सुदाम धुपे, मजीप्राचे कार्यकारी अभियंता दिनेश बोरकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)