आरंभीत युवकांनी केली दारूची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 10:13 PM2018-03-03T22:13:06+5:302018-03-03T22:13:06+5:30

तालुक्यातील आरंभी येथील युवकांनी दारूची होळी पेटवून समाजातून व्यसनांना हद्दपार करण्याचा उपक्रम राबविला. यामुळे युवकांचे कौतुक होत आहे.

Early youths celebrate Holi with alcohol | आरंभीत युवकांनी केली दारूची होळी

आरंभीत युवकांनी केली दारूची होळी

googlenewsNext
ठळक मुद्देचांगला संदेश : समाजापुढे निर्माण केला आदर्श

ऑनलाईन लोकमत
दिग्रस : तालुक्यातील आरंभी येथील युवकांनी दारूची होळी पेटवून समाजातून व्यसनांना हद्दपार करण्याचा उपक्रम राबविला. यामुळे युवकांचे कौतुक होत आहे.
दारू हा दोन अक्षरी शब्द. मात्र कोट्यवधी लोकांना लोळवण्याचे धाडस या मदिरेत आहे. दारूमुळे अनेक संसार उघड्यावर पडले आहे. त्यात होळी आणि दारू, यांचे अतूट नाते दिसून येते. वास्तविक अनिती, अमंगल यांना होळीत जाळून नवीन चांगली सुरुवात करण्याचा हा सण आहे. हीच बाब हेरून आरंभी येथील तरूणांनी चक्क दारूची होळी पेटविली आणि समाजाला चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला. गेल्यावर्षीही तरुणांनी अशीच होळी सारी केली होती.
सध्या समाजात अनैतिकतेचे प्रस्थ वाढत आहे. दारूमुळे अनैतिकतेला हातभार लागतो. अनेक घरांचे वाटोळे होते. दारू ही समाजाला लागलेली कीड आहे. समाजाला दारूचे दुष्परिणाम समजावे, दारूपासून सर्वांनी परावृत्त व्हावे, यासाठी गावातील काही तरुण दारूमुक्त होळीसाठी प्रयत्नशील आहे.
याच तरुणांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने दरवर्षी होळीच्या पर्वावर दारूची होळी पेटविली जाते. यातून दारू सोडा शरबत प्या, हा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमात जय राठोड, सुधीर राठोड, जगदीश चव्हाण, विशाल राठोड, नरेंद्र चव्हाण, देवा पवार, सोम राठोडसह अनेक युवकांनी पुढाकार घेऊन समाजाला व्यसनमुक्तीचा संदेश दिला. गावातील या युवकांच्या कार्याला ज्येष्ठांचेही नेहमी पाठबळ लाभते. त्यामुळे व्यसनमुक्त समाजाच्या दिशेने गावाची वाटचाल सुरू आहे.
जिल्ह्यात दारूबंदी व्हावी, युवकांची अपेक्षा
चंद्रपूर प्रमाणे यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी व्हावी, अशी अपेक्षा या गावातील युवकांनी व्यक्त केली. त्यासाठी चळवळ उभी राहात असून या चळवळीला आमचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. दारूची होळी ही संकल्पना काहींना मनोरंजनात्मक वाटत असली, तरी दारूचे दुष्परिणाम समजावून समाजात चांगला संदेश देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दारू सोडा, शरबत प्या या उपक्रमाला उत्स्फूर्त सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Early youths celebrate Holi with alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.