दहाचे कॉईन परत येणार नाही

By admin | Published: February 9, 2017 12:25 AM2017-02-09T00:25:14+5:302017-02-09T00:25:14+5:30

दहा रूपयाचे कॉईन बंद होणार असल्याच्या अफवेने बाजारात चांगलाच जोर धरला आहे.

The ears of ten shall not return | दहाचे कॉईन परत येणार नाही

दहाचे कॉईन परत येणार नाही

Next

छोटे व्यवहार अडचणीत : अफवांमुळे दररोज जमा होत आहेत हजारो कॉर्ईन
यवतमाळ : दहा रूपयाचे कॉईन बंद होणार असल्याच्या अफवेने बाजारात चांगलाच जोर धरला आहे. परंतु दहा रूपयाचे कॉईन बंद होणार नसल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. त्यानंतरही बँकामध्ये दररोज हजारो कॉईन जमा होत आहे. जमा होणारे कॉईन परत येणार नसल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे भविष्यात चिल्लर नाण्याच्या तुटवडयाचा सामना सर्वसामान्यांना करावा लागण्याचा धोका वाढला आहे.
पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर दहा रूपयाचे कॉईन बंद होण्याची अफवा पसरली. या अफवेने सर्वसामान्य चांगलेच अडचणीत सापडले आहेत. छोटे दुकानदार, हमाल, भाजी विक्रेते, फळविक्रेते, कटिंगवाले, हॉटेल व्यवसाई, अ‍ॅटोरिक्षा चालक यासारखे अनेकजण दहा रूपयाचा कॉईन नाकारत आहेत. यामुळे सर्वसामान्य ग्राहक वैतागला आहे.
यामुळे दहा रूपयांचे कलदार घेवून बँकेत येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यापूर्वी कधीही बँकांमध्ये चिल्लर गोळा करण्यासाठी गर्दी झाली नव्हती. एकवेळा बाजारात आलेले नाणे ४० ते ५० वर्षे झिजत नाही. त्यामुळे ते बाद होत नाही. मात्र बँकेत जमा झालेले नाणे रिझर्व बँक परत पाठवित नाही. ते वितळून नवीन नाण्यासाठी त्याचा वापर होतो. ही प्रक्रीया महागडी आहे. यामुळे नवीन नाणे छापण्याची गती मंद असते. यातून बाजारात मोजकेच चिल्लर नाणे दिसतात. त्यामुळे अडचण निर्माण होत आहे.
मात्र अफवेने १० रूपयांचा व्यवहारच अडचणीत सापडला आहे. ही नाणे बँकेत जमा झाल्यास भविष्यात चिल्लर व्यवहार होणे अवघड होणार आहे. (शहर वार्ताहर)

डुप्लिकेट नाणे अशक्य
नाणे तयार करण्यासाठी येणारा खर्च किमतीच्या बरोबरीचा आहे. यामुळे १० रूपयांची डुप्लीकेट नाणे बाजारात येणे अशक्य असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. नाणे बंद होणार ही अफवा आहे. त्याला बळी न पडण्याचे आवाहनसुद्धा बँकेने केले आहे. तसेच दहा रुपयांचे नाणे नाकारणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते.

 

Web Title: The ears of ten shall not return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.