यवतमाळात पसरतेय माती खाण्याचे व्यसन

By admin | Published: December 29, 2015 08:25 PM2015-12-29T20:25:28+5:302015-12-29T20:25:28+5:30

मातीवर आपल्या जिल्ह्याचे प्रेम. एक दाणा पेरून लाख दाणे उगविण्याची मातीची किमया सर्वज्ञात आहे. मातीची मूर्ती होते. मातीचे घरही होते. पण मातीतून नशाही येते म्हटले तर...!

Eating in the Yavatmal Food Eaters | यवतमाळात पसरतेय माती खाण्याचे व्यसन

यवतमाळात पसरतेय माती खाण्याचे व्यसन

Next


अविनाश साबापुरे - यवतमाळ
मातीवर आपल्या जिल्ह्याचे प्रेम. एक दाणा पेरून लाख दाणे उगविण्याची मातीची किमया सर्वज्ञात आहे. मातीची मूर्ती होते. मातीचे घरही होते. पण मातीतून नशाही येते म्हटले तर...!
होय, माती चघळून धुंद होणारी शेकडो माणसे आपल्याच यवतमाळात आहेत. माती आवडणे हा भाग वेगळा आणि माती खाण्याचे व्यसनच जडणे वेगळे. माती खल्ल्याशिवाय, चघळल्याशिवाय चैनच पडत नाही, असे सांगणारी ही माणसे माती प्रेमात नव्हे, व्यसनातच बुडाली आहेत.
व्यसनासाठी चघळली जाणारी ही माती मात्र सर्वसाधारण नाही. दुधी पांढऱ्या रंगाची ही माती खास राजस्थानातून यवतमाळात आयात करण्यात येत आहे. या मातीचे ढोक ३-४ विक्रेते असून त्यांच्या माध्यमातूनच ही माती यवतमाळ व लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील दुकानांपर्यंत पोहोचविली जात आहे. शहरातील बांगरनगर, आर्णी रोड, धामणगाव रोड या परिसरातील दुकानांमध्ये ही दुधी पांढरी माती मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. या मातीचे व्यसन करणारे लोक तिला ‘माला माती’ म्हणून ओळखतात. या मातीला चव नाही. गंध नाही. पण तिच्या सेवनाने संबंधिताला आनंद मिळतो. या मातीत कॅल्शियम असल्याने ही माती आरोग्याला घातक नाही, असे विक्रेते सांगतात. परंतु, माती चघळणाऱ्यांचे दिवसभरातील प्रमाण बघता ही माती घातक ठरण्याची शक्यता आहे. २५ ग्रॅम मातीची एक पुडी केवळ एक रुपयाला विकली जाते. एक व्यक्ती दिवसभरात दहा पुड्या खातो. म्हणजेच दिवसभरात पावभर (मुठभर) माती पोटात जाते.
श्रमपरिहार करण्यासाठी अनेक जण दारूच्या आहारी जातात. दारूसाठी पैसे नसले की तंबाखूवरही लत भागवली जाते. पण कोणत्याही एका व्यसनाच्या आहारी गेलेली व्यक्ती व्यसनाचे निरनिराळे मार्ग शोधते. त्यातूनच यवतमाळात अनेकांना माती खाण्याचे व्यसन जडले आहे. अन्न व औषध प्रशासनाने या मातीचे परीक्षण करण्याची गरज आहे.

Web Title: Eating in the Yavatmal Food Eaters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.