शहरांप्रमाणे शिक्षणाचाही ‘डीपी’ हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 11:05 PM2018-01-20T23:05:09+5:302018-01-20T23:06:16+5:30

आपण आपल्या शहराचा डीपी (विकास आराखडा) तयार करतो. तसाच केंद्र सरकारने शिक्षणाचाही डीपी तयार करावा. सध्या वेगवेगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये मागणी कमी पुरवठा जास्त अशी स्थिती आहे. शिक्षणाचा विकास आराखडा तयार असल्यास पुढच्या काळात कोणत्या अभ्यासक्रमाला जास्त मागणी असेल,

Education like 'city' is 'DP' | शहरांप्रमाणे शिक्षणाचाही ‘डीपी’ हवा

शहरांप्रमाणे शिक्षणाचाही ‘डीपी’ हवा

Next
ठळक मुद्देविनोद तावडे : जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकीमध्ये ‘युफोरिया’चे धडाक्यात उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आपण आपल्या शहराचा डीपी (विकास आराखडा) तयार करतो. तसाच केंद्र सरकारने शिक्षणाचाही डीपी तयार करावा. सध्या वेगवेगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये मागणी कमी पुरवठा जास्त अशी स्थिती आहे. शिक्षणाचा विकास आराखडा तयार असल्यास पुढच्या काळात कोणत्या अभ्यासक्रमाला जास्त मागणी असेल, याचे चित्र स्पष्ट होईल. त्यानुसार विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची निवड करता येईल. त्यातून सुशिक्षित बेरोजगारांची निराशा टळू शकेल, अशी आशा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी येथे व्यक्त केली.
जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘युफोरिया-१८’ स्नेहसंमेलनाचे शनिवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले. त्यावेळी ना. तावडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष विजय दर्डा होते. सचिव किशोर दर्डा, उच्च व तंत्र शिक्षण मंडळाचे विभागीय सहसंचालक डी. व्ही. जाधव, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, समन्वयक डॉ. पी. एम. पंडित, शिवाणी बिहाडे, नितेश धैर्य आदी मंचावर उपस्थित होते.
ना. विनोद तावडे म्हणाले, जेडीआयईटीच्या रूपाने दर्डा परिवाराने चांगली संस्था उभी केली आहे. असा प्रशस्त कॅम्पस मिळणे ही विद्यार्थ्यांना संधी आहे. इथे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये प्रबंध सादर करण्याची संधी दिली जाते. ती पुण्या-मुंबईच्या विद्यार्थ्यांनाही मिळत नाही. त्यासोबतच आता अभियांत्रिकी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ‘उद्योजक’ बनण्याचेही प्रशिक्षण दिले पाहिजे. पंतप्रधानांच्या ‘स्टार्ट अप इंडिया’साठी ते आवश्यक आहे. त्यावरच आता महाविद्यालयांचे ‘ग्रेडेशन’ ठरणार आहे.
लोकमतच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा म्हणाले, आपली शिक्षण पद्धती अमेरिकन पॅटर्ननुसार सुरू आहे. पण आपण अमेरिकन पॅटर्नही पूर्णपणे स्वीकारलेला नाही अन् भारतीय पॅटर्नही पूर्णपणे घेतलेला नाही. आता आपल्याला चायना पॅटर्नकडे जाण्याची गरज आहे. विद्यार्थी केवळ ‘जॉब ओरिएन्टेड’ होताहेत. ‘इनोव्हेशन’ची कमतरता दिसते.
आजच्या काळात कौशल्य महत्त्वाचे आहे. नुकताच मी इस्त्राईला गेलो होतो. तेथे एका गाईडचे एका दिवसाचे भाडे साडेतीनशे डॉलर आहे, ड्रायव्हर सव्वालाख घेतो. पण आपल्याकडे कौशल्यावर आधारित शिक्षणाकडे दुर्लक्ष झाल्याने उच्च शिक्षण घेऊनही बेकारी वाढत आहे. शिक्षण विभागाने यात बदल करावा अशी अपेक्षा आहे.
यावेळी जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे सचिव किशोर दर्डा यांनी प्रास्ताविक केले. तर प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांनी महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीचा आढावा सादर केला. सूत्रसंचालन प्रा. मोहीत पोपट यांनी केले. तर आभार डॉ. पी. एम. पंडित यांनी मानले.
यावर्षी दहावीची पुस्तके बदलणार
शिक्षण विभाग सध्या संघटनांच्या मागण्या, न्यायालयांचे निर्णय यात गुंतून पडला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ऐन प्रवेश प्रक्रियेच्या तोंडावरच ‘नीट’ परीक्षा घेण्याचा निर्णय दिला. मात्र, शिक्षण म्हणजे ‘स्विच आॅन स्विच आॅफ’ नव्हे. अचानक बदल करता येत नाही. विद्यार्थ्यांना वेळ द्यावा लागतो. मला दहावीचा अभ्यासक्रम बदलायचा होता. त्यासाठी मी मागच्या वर्षी नववीची पुस्तके बदलली. आता यंदा दहावीसाठी नवीन पुस्तके देणार आहोत, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

Web Title: Education like 'city' is 'DP'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.