‘पेन’शिवाय लागेना तब्बल 32 लाख विद्यार्थ्यांचा पत्ता; शाळांचे दुर्लक्ष आता शाळांच्याच आलेय अंगलट
By अविनाश साबापुरे | Published: July 7, 2024 07:51 AM2024-07-07T07:51:57+5:302024-07-07T07:52:20+5:30
३२ लाख विद्यार्थ्यांचा शोध लावण्याचे आव्हान शिक्षण विभागापुढे आ वासून उभे
यवतमाळ : जुने शैक्षणिक सत्र संपून आता नव्या सत्राला सुरुवात झाली आहे. परंतु, गेल्या वर्षी महाराष्ट्रातील शाळांमध्ये शिक्षण घेत असलेले तब्बल ३२ लाख विद्यार्थी यंदा कुठे गेलेय, याचा थांगपत्ता शिक्षण विभागाला लावता आलेला नाही. वर्षभरात तब्बल ३७ लाख ४५ हजार ३६७ विद्यार्थ्यांनी शाळा बदलल्या. त्यातील साडेपाच लाख विद्यार्थी कुठे गेले, याचा हिशेब यूडायसमध्ये आलेला आहे. तर ३२ लाख विद्यार्थ्यांचा शोध लावण्याचे आव्हान शिक्षण विभागापुढे आ वासून उभे आहे. शाळांनी या विद्यार्थ्यांच्या टीसीवर ‘पेन’ क्रमांक न नोंदविल्याने हा घोळ झाला आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याला ११ अंकी पेन क्रमांक (पर्मनंट एज्युकेशन नंबर) देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या क्रमांकावरून देशभरातील कोणत्याही विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास शोधता येणार आहे. परंतु, महाराष्ट्रातील अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना टीसी देताना त्यावर हा क्रमांक नोंदविला नाही. त्यामुळे संबंधित विद्यार्थी पुढच्या शाळेत, महाविद्यालयात गेल्यावरही यूडायसमध्ये त्याची नोंद कठीण होत आहे. अशा ३१ लाख ९६ हजार ७८६ विद्यार्थ्यांचा अहवाल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने ४ जुलै रोजी जाहीर केला आहे.
हे विद्यार्थी सध्या स्टुडंट पोर्टलच्या ‘ड्राॅप बाॅक्स’मध्ये पडलेले आहेत. त्यांना कोणत्या शाळेच्या लाॅगीनवर ‘इम्पोर्ट’ करायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांचे काय काय झाले?
इतर जिल्हा/राज्यात गेले ९५,२१८
बारावीनंतर शाळा सोडली ४०,४०९
आयटीआय, पाॅलिटेक्निकला गेले २८,८३४
अनियमित अभ्यासक्रमाला गेले ९,८६३
मुक्त विद्यापीठाकडे वळले २,९२८
‘डुप्लिकेट’ नोंद होती २,५०,०३२
अर्धवट शिक्षण सोडले १,१८,९९७
बाॅक्स’मध्येच आहेत ३१,९६,७८६
किती विद्यार्थ्यांचा मृत्यू? कितींनी सोडले शिक्षण
जिल्हा मृत्यू शिक्षण सोडले
अहमदनगर १०५ ४३४४
अकोला १३ १४३२
अमरावती ११ १२३०
भंडारा १४ ३९६
बीड ४३ ५६१
बुलडाणा ४५ ३१०१
चंद्रपूर २२ ११७१
छ.संभाजीनगर ६० ५२६८
धाराशिव ४३ १५३३
धुळे ५० ३०८२
गडचिरोली १८ १३०६
गोंदिया १६ ६९९
हिंगोली ८ ७३४
जळगाव ४७ ७२९२
जालना १२ १६३९
कोल्हापूर २५ २८२०
लातूर १५ ८३३
मुंबई ८७ १८३४१
नागपूर ५१ ९९
नांदेड ३१ २९५५
नंदुरबार ३५ ४७३९
नाशिक ६२ ४२९९
पालघर ३६ ५४४५
परभणी ९ २२२३
पुणे २२५ १९३६३
रायगड १५ ३३८०
रत्नागिरी २५ १२४३
सांगली २६ १३३८
सातारा ३६ ३४७
सिंधुदुर्ग ११ ५०३
सोलापूर ३१ २८३३
ठाणे २४५ ९५३२
वर्धा १६ १२२४
वाशिम ३२ २९२०
यवतमाळ २२ ७७२