राज्य नाट्य स्पर्धेसाठी आठ नाटके

By admin | Published: October 30, 2014 10:59 PM2014-10-30T22:59:13+5:302014-10-30T22:59:13+5:30

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती संचालनालयाच्यावतीने दरवर्षी राज्य नाट्य स्पर्धांचे आयोजन केले जाते. यावर्षी ५४ व्या राज्य नाट्य स्पर्धेसाठी चंद्रपूर केंद्रावर यवतमाळच्या आठ

Eight plays for state drama competition | राज्य नाट्य स्पर्धेसाठी आठ नाटके

राज्य नाट्य स्पर्धेसाठी आठ नाटके

Next

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती संचालनालयाच्यावतीने दरवर्षी राज्य नाट्य स्पर्धांचे आयोजन केले जाते. यावर्षी ५४ व्या राज्य नाट्य स्पर्धेसाठी चंद्रपूर केंद्रावर यवतमाळच्या आठ हौशी नाट्य संस्था सहभागी होत आहेत. राज्य नाट्य स्पर्धेनंतर या नाटकांचे प्रयोग यवतमाळ येथे होणार असून यवतमाळकर नाट्यरसिकांना ही पर्वणी असणार आहे.
ही नाटके सादर करण्यासाठी यवतमाळचे नाट्यगृह तयार असणार नाही ही तमाम यवतमाळकरांसाठी शोकांतिका आहे. चंद्रपूर येथे १९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या दरम्यान ही नाटके सादर होणार आहेत. १९ नोव्हेंबरला ‘अविष्कार’तर्फे ‘फायनल ड्राफ्ट’ हे गिरीश जोशी लिखित आणि जयंत कर्णिक दिग्दर्शित नाट्य सादर होणार असून यात राजन टोंगो आणि आरती मोरे यांच्या भूमिका आहेत. तंत्रज्ञाची बाजू रवींद्र ढगे सांभाळणार आहेत. ‘कलाकांचन’तर्फे संजय पवार लिखित आणि विनोद बिंड दिग्दर्शित ‘कोण म्हणतो टक्का दिला’ ही नाट्यकृती २० नोव्हेंबरला सादर होणार आहे. प्रवीण दमकोंडावार, नितीन ठाकरे, स्वानंद खपली, तृष्णा माकडे, वैष्णवी चौधरी, अश्विनी कार्लेकर, राजू बिदरकर, अमोल मुक्कावार, सुनील जतकर यांच्या भूमिका यात असून तंत्रनिर्देशक प्रमोद बावीस्कर आहेत.
पंचमदेव निर्मित ‘राहिले दूर घर माझे’ हे नाटक २१ नोव्हेंबर सादर होणार असून लेखक शफाअद खान तर दिग्दर्शक राजाभाऊ भगत आहेत. किशोर गवरशेट्टीवार, विलास सुतार, सुधा भगत, प्रतिभा सुकलकर, पायल माथने, श्रावण चांदेकर, विनोद नेवास्कर, अण्णा तायडे, राजू बिडवे, दादा ताटेवार इत्यादी कलावंतांच्या भूमिका यात आहेत. कलावैभव यवतमाळतर्फे दत्ता भगत लिखित, अविनाश बन्सोड दिग्दर्शित ‘वाटा पळवाटा’ ही नाट्यकृती २४ नोव्हेंबरला सादर होणार आहे. दशरथ मडावी, चारूलता पावशेकर, संगीता बारी, विवेक कांबळे, सचिन ढोबळे आणि अविश बन्सोड यांच्या भूमिकांनी हे नाटक नटले आहे. निर्माता राजाभाऊ पावशेकर असून चेतन-प्रबोधन संगीताची बाजू सांभाळणार आहेत.
कलाश्रयतर्फे २८ नोव्हेंबरला ‘सेलिब्रेशन’ ही प्रशांत दळवी लिखित आणि प्रशांत गोडे दिग्दर्शित नाट्यकृती सादर होणार आहे. किशोरी केळापुरे, प्रशांत गोडे, महेंद्र गुल्हाने, प्रियंका गोडे, प्रशांत जगताप, सतीश इसाळकर, अशोक गुल्हाने, शुभदा रणधीर, आसावरी इसाळकर, अश्विनी मिराशे यांच्या भूमिका असून कृष्णराव गोडे निर्मिती प्रमुख आहेत. सिद्धीविनायकतर्फे संजय पवार लिखित, कल्पना जोशी दिग्दर्शित ‘ए.के.४७’ हे नाटक २९ नोव्हेंबरला सादर होणार आहे. यात कल्पना जोशी, प्रफुल्ल ठाकरे, निरज मल्लेवार, संजय उईके, प्रणाली झोड आणि संजय माटे अभिनय करीत आहेत.
अस्मिता रंगायतनतर्फे ‘लग्न नको, पप्पा आवर’ हे आनंद भुरचंडी लिखित अशोक आष्टीकर दिग्दर्शित नाटक ३० नोव्हेंबरला सादर होणार आहे. अक्षय मिश्रा, केतन पळसकर, निखिल राठोड, केतन पारेख, ललिता घोडे, मैथिली देशपांडे, सुरभी परळीकर, साक्षी महाजन, मंजूषा खर्चे, अशोक आष्टीकर यांच्या भूमिका या नाटकात आहेत. तेजांकुर बहुद्देशीय संस्थाद्वारा पुनित मातकर लिखित, अपूर्वा सोनार दिग्दर्शित ‘ग्रीष्म दाह’ ही नाट्यकृती १ डिसेंबरला सादर होईल. अपूर्वा सोनार, पुनीत मातकर, अजय कोलारकर, अविनाश मानेकर, समृद्धी रेळे, स्रेहा पारोंदे, उषा खटे यांच्या भूमिका असून अनेक नाटकांना प्रकाश योजना प्रकाश कार्लेकर यांचीच आहे. रंगदेवतेंच्या सर्व उपासकांच्या तालमी शहराच्या भिन्न-भिन्न भागात रात्री सुरू आहेत. (सांस्कृतिक प्रतिनिधी)

Web Title: Eight plays for state drama competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.