कोळशाने भरलेले संशयास्पद आठ ट्रक पोलिसांच्या ताब्यात, वणी पोलिस व एलसीबीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 07:36 PM2023-01-11T19:36:11+5:302023-01-11T19:36:23+5:30

मुकुटबनकडून वणीकडे येत असलेले आठ कोळशाचे ट्रक वणी पोलिस व वणी एलसीबीने संयुक्तरीत्या कारवाई करत ताब्यात घेतले.

Eight suspicious trucks full of coal in police custody, action of Vani police and LCB | कोळशाने भरलेले संशयास्पद आठ ट्रक पोलिसांच्या ताब्यात, वणी पोलिस व एलसीबीची कारवाई

कोळशाने भरलेले संशयास्पद आठ ट्रक पोलिसांच्या ताब्यात, वणी पोलिस व एलसीबीची कारवाई

googlenewsNext

संतोष कुंडकर

वणी (यवतमाळ): मुकुटबनकडून वणीकडे येत असलेले आठ कोळशाचे ट्रक वणी पोलिस व वणी एलसीबीने संयुक्तरीत्या कारवाई करत ताब्यात घेतले. बुधवारी सकाळी झालेल्या या कारवाईने कोळसा उद्योगात चांगलीच खळबळ उडाली आहे. हे ट्रक कुठून कुठे जात होते, याचा तपास आता वणी पोलिस करत आहे.

वणी-मुकुटबन मार्गावरून कोळशाची अवैधरीत्या वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती वणीचे ठाणेदार प्रदीप सिरस्कर यांना मिळाली. त्यावरून सापळा रचण्यात आला. बुधवारी सकाळी मुकुटबनकडून वणीकडे येत असलेले आठ ट्रक पोलिसांनी अडविले. या ट्रकची झडती घेतली असता, या आठही ट्रकमध्ये कोळसा भरून होता. एमएच ४० बीजी २६५८, एमएच ३४ बीझेड २५२८, एमएच ३१ सीक्यू ७४६६, एमएच ३१ सीक्यू ४७५२, एमएच ३४ बीझेड २५२९, एमएच ४० बीजी ०२६०, एमएच २९ बीई ४०८९, एमएच ३४ बीजी २४७८ असे ताब्यात घेण्यात आलेल्या आठ वाहनांची क्रमांक आहेत.

पोलिसांनी संबंधित ट्रकचालकांना कागदपत्रांची मागणी केली असता, एकाही चालकाजवळ वैध कागदपत्रे उपलब्ध नव्हती. त्यानंतर सर्व ट्रक चालकांसह वणीत आणण्यात आले. त्यानंतर रीतसर चौकशी करून याप्रकरणी कलम ४१ (१), (ड) अन्वये सर्व ट्रक डिटेन करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या ट्रकची किंमत दोन कोटी २१ लाख रुपये आहे, तर या ट्रकमध्ये २० लाख ८० हजारांचा कोळसा भरून होता. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, वणीचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार, ठाणेदार प्रदीप सिरस्कर, एलसीबीचे पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक माधव शिंदे, अमोल मुडे, पोलिस हवालदार उल्हास कुरकुटे, सुनील खंडागळे, नायक पोलिस सुधीर पांडे, महेश नाईक, सुधीर पिदूरकर, चालक सतीश कुटे, हरिंद्रकुमार भारती, वसीम शेख, सुरेश किनाके यांनी पार पाडली. या कारवाईने कोळसा व्यावसायिकांत चांगलीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात येणार आहे.

सर्वांत मोठी कारवाई

अलीकडील काही महिन्यांतील पोलिसांनी केलेली ही सर्वांत मोठी कारवाई आहे. हा कोळसा नेमका कोणत्या खाणीतून आला व तो कुठे नेण्यात येत होता, याचा सखोल तपास करण्याचे मोठे आव्हान वणी पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. यातून या व्यवसायातील मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

Web Title: Eight suspicious trucks full of coal in police custody, action of Vani police and LCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.