‘नरेगा’वर आठ हजार मजूर

By admin | Published: May 23, 2017 01:21 AM2017-05-23T01:21:44+5:302017-05-23T01:21:44+5:30

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) जिल्ह्यात सुरू असलेल्या २९१ कामांवर आठ हजार मजूर काम करीत आहे.

Eight thousand laborers on NREGA | ‘नरेगा’वर आठ हजार मजूर

‘नरेगा’वर आठ हजार मजूर

Next

पूर संरक्षक भिंत : शौचालय, घरकुलांची कामे, २९१ कामे प्रगतिपथावर
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) जिल्ह्यात सुरू असलेल्या २९१ कामांवर आठ हजार मजूर काम करीत आहे. जिल्ह्यात शौचालय, घरकूल, पूर संरक्षक भींतीचे काम सुरू आहेत.
जिल्ह्यातील १६ तालुक्यांत नरेगाच्या १२५ शौचालयांचे काम सुरू आहे. या कामांमुळे दोन हजार २५० मजुरांना रोजगार मिळाला आहे. यात १४१ घरकुलांचे कामे सुरू असून त्यावर चार हजार २३० मजूर कार्यरत आहे. नॅडॅप कंपोस्ट खताची आठ कामे सुरू असून त्यावर १४४ मजूर काम करीत आहे. उघड्या गटारांची ११ कामे सुरू असून त्यावर ९९० मजूर कार्यरत आहे. याशिवाय आर्णी तालुक्यात चार ठिकाणी पूर संरक्षक भींतीचे काम सुरू असून त्यावर ३६० मजूर काम करीत आहे.
जिल्ह्यात नरेगाची एकूण २९१ कामे तूर्तास सुरू आहे. या सर्व कामांमुळे आठ हजार १० मजुरांना रोजगार मिळाला आहे. यात आर्णी तालुक्यातील ५० कामांवर सर्वाधिक दोन हजार ११२ मजूर आहे, उमरखेड तालुक्यातील ४६ कामांवर एक हजार८० मजूर कार्यरत आहे. सर्वात कमी मजूर दारव्हा तालुक्यात आहे. या तालुक्यात दोनच कामे सुरू असून त्यातून केवळ ४८ मजुरांना रोजगार मिळाला आहे.

कळंब, मारेगाव निरंक
अदिवासीबहुल मारेगाव व कळंब तालुक्यात नरेगातून एकही काम सुरू नाही. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील मजुरांच्या हातांना काम नाही. त्यांना शेती व इतर कामांवर राबावे लागत आहे. या दोन तालुक्यात शौचालय, घरकूल, कंपोस्ट खत, गुरांचा गोठा, पूर संरक्षक भींत, उघडी गटारे, विहीर पुनर्भरण यापैकी एकही काम सुरू नसल्याचे मागील सप्ताहातील अहवालावरून दिसून येत आहे.
विहीर पुनर्भरण रखडले
जिल्हा परिषदेने विहीर पुनर्भरण कार्यक्रम धडाक्यात राबविण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रत्यक्षात गेल्या सप्ताहापर्यंत एकाही तालुक्यात नरेगातून या कामाला सुरूवात झाली नाही. तथापि यवतमाळ तालुक्यात दोन ठिकाणी गुरांच्या गोठ्याचे बांधकाम मात्र सुरू आहे.

Web Title: Eight thousand laborers on NREGA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.