पहिल्याच दिवशी एसटीत बसले आठ हजार प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 05:00 AM2020-08-21T05:00:00+5:302020-08-21T05:00:07+5:30

तब्बल पाच महिन्यानंतर परजिल्ह्यातील बसफेऱ्या गुरूवारी सुरू झाल्या. यामुळे सकाळपासूनच बसस्थानकावर प्रवाशांची वर्दळ पहायला मिळाली. बसस्थानकाबाहेर वाहक प्रवाशांना बोलविण्याचे काम करीत होते. तासभरानंतर वाहन भरले जात होते. यानंतर बस निघत होती. बसस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची नोंद घेतली जात होती. याशिवाय प्रवासी सोशल डिस्टन्स पाळत मास्कचाही वापर करताना दिसून आले.

Eight thousand passengers sat in the ST on the first day | पहिल्याच दिवशी एसटीत बसले आठ हजार प्रवासी

पहिल्याच दिवशी एसटीत बसले आठ हजार प्रवासी

Next
ठळक मुद्दे१२९ कर्मचारी कर्तव्यावर : ३२६ बसफेऱ्या आणि चार लाखांचे उत्पन्न

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बहुप्रतीक्षेनंतर गुरुवारी सुरू झालेल्या एसटीला पहिल्याच दिवशी आठ हजार प्रवासी मिळाले. दिवसभरात ३२६ बसफेऱ्या झाल्या. यातून महामंडळाला चार लाखांचे उत्पन्न मिळाले.
तब्बल पाच महिन्यानंतर परजिल्ह्यातील बसफेऱ्या गुरूवारी सुरू झाल्या. यामुळे सकाळपासूनच बसस्थानकावर प्रवाशांची वर्दळ पहायला मिळाली. बसस्थानकाबाहेर वाहक प्रवाशांना बोलविण्याचे काम करीत होते. तासभरानंतर वाहन भरले जात होते. यानंतर बस निघत होती.
बसस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची नोंद घेतली जात होती. याशिवाय प्रवासी सोशल डिस्टन्स पाळत मास्कचाही वापर करताना दिसून आले. या ठिकाणी निमआराम बसेसही सोडण्यात आल्या.
गुरुवारी यवतमाळ आगारात ५२ फेऱ्या झाल्या. या ठिकाणी १३९७ प्रवाशांची नोंद करण्यात आली. पुसद आगारात ५० फेऱ्या झाल्या. १२३४ प्रवासी मिळाले. वणीतील फेऱ्यांची संख्या १४ पर्यंतच मर्यादित होती. ३६४ प्रवासी या ठिकाणी होते. उमरखेडमध्ये ४६ फेऱ्या झाल्या. १२८० प्रवाशांनी या ठिकाणी प्रवास केला. दारव्हा आगारात ५६ फेऱ्या झाल्या. १३२२ प्रवाशांनी या ठिकाणी प्रवास केला. पांढरकवडा आगारात २१ फेऱ्या झाल्या. या ठिकाणी ६९० प्रवाशांनी प्रवास केला. नेर आगारात ३९ बसफेऱ्या झाल्या. १०५८ प्रवाशांची या ठिकाणी नोंद झाली. दिग्रस आगारात २४ बसफेऱ्या झाल्या, ५४७ प्रवाशांची या ठिकाणी नोंद करण्यात आली. राळेगाव आगारात २४ बसफेऱ्या झाल्या. या ठिकाणी ४१० प्रवाशांची नोंद करण्यात आली.
पहिल्याच दिवशी तीन लाख ९९ हजार २३८ रूपयांचे उत्पन्न महामंडळाला मिळाले. पुढे ही संख्या वाढण्याचा अंदाज एसटी विभागाचे डीटीओ राठोड यांनी व्यक्त केला.

Web Title: Eight thousand passengers sat in the ST on the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.