६५ ग्रामपंचायतींची निवडणूक

By admin | Published: March 13, 2016 02:56 AM2016-03-13T02:56:39+5:302016-03-13T02:56:39+5:30

कार्यकाळ संपणाऱ्या ६५ ग्रामपंचायतींची निवडणूक १७ एप्रिल रोजी होणार आहे. ६५ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक तर, ८० ग्रामपंचायतींची पोटनिवडणुक पार पडणार आहे.

Election of 65 Gram Panchayats | ६५ ग्रामपंचायतींची निवडणूक

६५ ग्रामपंचायतींची निवडणूक

Next

१७ एप्रिलला मतदान : ८० ठिकाणी पोटनिवडणुका
यवतमाळ : कार्यकाळ संपणाऱ्या ६५ ग्रामपंचायतींची निवडणूक १७ एप्रिल रोजी होणार आहे. ६५ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक तर, ८० ग्रामपंचायतींची पोटनिवडणुक पार पडणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने मे ते आॅगस्टमध्ये पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये आठ तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक, नव्याने स्थापन झालेल्या दोन ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहे. ८० ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांचा यात समावेश आहे.
१८ मार्चला निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध होईल. २९ मार्चपासून २ एप्रिलपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे. ४ एप्रिलला अर्जाची छाननी केली जाणार आहे. ६ एप्रिलला नामनिर्देशनपत्र परत घेण्याची अंतिम तारीख असून याच दिवशी चिन्हांचे वितरण करण्यात येणार आहे. १७ एप्रिलला मतदान होणार आहे. २१ एप्रिलला निकाल घोषित केला जाणार आहे.
आठ तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. यात आर्णी तालुक्यातील दातोडी, खडका, उमरी कापेश्वर ग्रामपंचायतींचा समावेश आहे. मारेगावातील कन्हाळगाव, जळका, सगणापूर, मच्छीद्रा, वरूड, डोलडोंगरगाव, सराटी, गोधणी, वागदरा, खंडनी आणि अर्जुनी अशा ११ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. झरीजामणीतील हिवरा बारसा, शिबला, निमणी, अडकोली, जामणी, खरबडा, माथार्जुन, दाभा, कारेगाव या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
केळापूर तालुक्यातील खैरगाव, अकोली बु., मारेगाव मोरवा, पढा, ताड उमरी, वाघोली, बोथ, झुली, मिरा, खैरगाव (दे), धारणा, घोडदरा, दाभा, मोहदा, करंजी रोड, केगांव, आसोली, मराठवाकोडी, सुसरी, भाडउमरी, कारेगांव बंडल, मुझाळा, कोठाडा, मंगी, डोंगरगाव तर राळेगाव तालुक्यातील वाटखेड, चोंडी, खैरगाव, खेमकुंड, पळसकुंड, एकुर्ली, आठमुर्डी, कारेगांव, चिखली, सावनेर या ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. घाटंजीतील पारवा, घोटी, टिटवी, राजूरवाडी, ताडसावळी, कोळी (खु) आणि कळंब तालुक्यातील थाळेगाव व महागाव तालुक्यातील कोनदरीचा यामध्ये समावेश आहे.
८० ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक
जिल्ह्यातील ८० ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात पोटनिवडणूक होत आहे. त्यामध्ये सर्वाधिक १५ ग्रामपंचायती पुसद तालुक्यातील आहे. राळेगाव १२, दारव्हा ४, केळापूर २, कळंब ४, बाभूळगाव ५, वणी १०, दिग्रस २, आर्णी २, नेर १, मारेगाव ७, घाटंजी ६, यवतमाळ ७ तर महागाव तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींचा त्यात समावेश आहे. (शहर वार्ताहर)

Web Title: Election of 65 Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.