महागाव तालुक्यातील सरपंच, उपसरपंचाची निवड

By admin | Published: September 16, 2015 03:15 AM2015-09-16T03:15:32+5:302015-09-16T03:15:32+5:30

तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आता सरपंच व उपसरपंचाची निवड झाली आहे.

The election of Sarpanch, Upsarpanch, of Mahagaon taluka | महागाव तालुक्यातील सरपंच, उपसरपंचाची निवड

महागाव तालुक्यातील सरपंच, उपसरपंचाची निवड

Next


महागाव : तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आता सरपंच व उपसरपंचाची निवड झाली आहे. नवनिर्वाचितांकडून ग्रामस्थांना आता गावच्या विकासाची अपेक्षा आहे.
डोंगरगाव येथे सरपंचपदी दीपाली चवरे व उपसरपंच पदी शेख निसार शेख लाल यांची निवड झाली. ब्रह्मी येथे सरपंचपदी अनिता मनवर तर उपसरपंचपदी सुनीता चव्हाण, इजनी येथे सरपंचपदी अनिता उंबरे उपसरपंचपदी दत्ता चव्हाण, शिरपूर सरपंचपदी विश्वनाथ पिसे, उपसरपंचपदी गिरीधारी दौलतदार, फुलसावंगी सरपंचपदी कल्पना नखाते, उपसरपंचपदी अमरदीप दळवे, वाकोडी सरपंचपदी लक्ष्मी भडंगे, उपसरपंचपदी रफीक शेख गफार शेख, बोरी (इ) सरपंचपदी ताराबाई घावस, उपसरपंचपदी नामदेव राठोड, पोहंडूळ सरपंचपदी वर्षा खापरकर, उपसरपंचपदी अमोल रावते, हिवरा सरपंचपदी प्रवीण जामकर, उपसरपंचपदी धोंडीराव बोरूळकर, पेढी (इ) सरपंचपदी तुळसाबाई दवणे, उपसरपंचपदी सुरेखा सुरोशे, अनंतवाडी आनंदनगर सरपंचपदी मंदा पवार, उपसरपंचपदी सुरेश कवाणे, भांब पिंप्री सरपंचपदी वंदना पवार, उपसरपंचपदी रेणुका ढगे, शिरफुली सरपंचपदी ज्योती उभाडे, उपसरपंचपदी अर्चना गडदे, हिंगणी राजूरा सरपंचपदी सीमा काचगुंडे, उपसरपंचपदी मीरा ठाकरे, वाकान सरपंचपदी हिरासिंग जाधव, उपसरपंचपदी सुनीता राठोड, कोठारी सरपंचपदी सुनीता मार्कंडे, उपसरपंचपदी चावडीबाई जाधव, वडद (मु) सरपंचपदी रामदास साबळे, उपसरपंचपदी लक्ष्मीबाई पाटील, करंजखेड सरपंचपदी प्रवीण ठाकरे, उपसरपंचपदी भरोस चव्हाण, माळेगाव सरपंचपदी दर्शना राठोड, उपसरपंचपदी शिवदास अनखुळे, चिंचोली सरपंचपदी शेषराव राठोड उपसरपंचपदी भीमराव कोकणे, सवना सरपंचपदी खुशाल महागावकर, उपसरपंचपदी गोविंदराव देशमुख, पिंपळगाव (का) सरपंचपदी वच्छला जाधव, उपसरपंचपदी प्रताप राठोड, मोरथ सरपंचपदी ज्योती वानखेडे, उपसरपंचपदी सुधीर देवरसे, मोहदी सरपंचपदी रमलीबाई आडे, उपसरपंचपदी प्रीती राठोड, करंजी सरपंचपदी छाया वऱ्हाडे, उपसरपंचपदी मोतीराम राठोड, आमणी खु. सरपंचपदी विमल राठोड, उपसरपंचपदी संजय शिंदे, पोखरी सरपंचपदी बेबी आडे, उपसरपंचपदी देवानंद खिल्लारे, काळी टेंभी सरपंच शिला चव्हाण, उपसरपंच शालू आढाव, दहीसाळी सरपंच नैरुनिसाबी अजीज शेख, उपसरपंचपदी भीमराव महाले, टेंभी सरपंचपदी माया रहाटे, चिचपाड सरपंचपदी प्रकाश राठोड, उपसरपंचपदी बेबीबाई राठोड, वाकद ई. सरपंचपदी कविता मुळे तर चिलगव्हाण उपसरपंचपदी जयश्री भाकरे आदींची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. या निवडीनंतर गावागावात समर्थकांनी जल्लोष केला. अनेक गावांमध्ये नवनिर्वाचितांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The election of Sarpanch, Upsarpanch, of Mahagaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.