Maharashtra Election 2019 : निवडणुका शहरकेेंद्री, त्यामुळे खेड्यांकडे दुर्लक्ष- श्रीहरी अणे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 05:11 PM2019-10-12T17:11:22+5:302019-10-12T17:12:04+5:30

सध्याच्या निवडणुका केवळ शहरकेंद्री झाल्या आहेत.

Elections are the center of the city, hence the neglect of villages | Maharashtra Election 2019 : निवडणुका शहरकेेंद्री, त्यामुळे खेड्यांकडे दुर्लक्ष- श्रीहरी अणे

Maharashtra Election 2019 : निवडणुका शहरकेेंद्री, त्यामुळे खेड्यांकडे दुर्लक्ष- श्रीहरी अणे

Next

यवतमाळ : सध्याच्या निवडणुका केवळ शहरकेंद्री झाल्या आहेत. त्यामुळे अशा निवडणुकांचे ‘आउटपूट’ही शहराभिमुखच असते. निवडून येणा-या राजकीय पक्षांचे खेड्यांकडे दुर्लक्ष होते. विदर्भात शेतकरी आत्महत्या होत असताना नागपुरात मेट्रो सुरू करणे हे त्याचेच द्योतक आहे, असे मत विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले. शनिवारी येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत अ‍ॅड. अणे बोलत होते.

विदर्भ राज्य आघाडीचे विधानसभा उमेदवार अ‍ॅड. अमोल बोरखडे यांच्याबाबत भूमिका मांडताना अणे यांनी एकंदरच निवडणुकांबाबत मुद्दे मांडले. ते म्हणाले, विधानसभेची निवडणूक ही स्थानिक मुद्द्यांवरच व्हावी. मात्र आज स्थानिक प्रश्नांना कोणताही राजकीय पक्ष महत्त्व देताना दिसत नाही. त्याऐवजी राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरच्या मुद्दे पुढे केले जात आहे. राफेल विमानाखाली लिंबू का ठेवले, यातच विरोधी पक्षही डोके खराब करून घेत आहे. मात्र राफेल घोटाळ्याबाबत कोणीही बोलत नाही. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांची बौद्धिक भांडवलाची खोली रिकामी झाली आहे. केवळ भावनिक मुद्द्यांच्या बळावर मते मिळवणे, एवढेच त्यांना कळते. मात्र राजकीय पक्षांनी आपला ‘फोकस’ बदलला नाही, तर ग्रामीण भागात राहणा-या ७० टक्के मतदारांना न्यायच मिळणार नाही. विदर्भ राज्य आघाडीचा उमेदवार मात्र ग्रामीण भागाशी जुळलेला आहे, असे अ‍ॅड. श्रीहरी अणे म्हणाले.
 
विदर्भ राज्य आघाडीचे कार्यकारी अध्यक्ष निरज खांदेवाले यावेळी म्हणाले, आम्ही अनेक समविचारी संघटना एकत्र येऊन विदर्भ निर्माण महामंच तयार केला आहे. भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात बंडाळी झाली आहे. त्याचा फायदा आम्हाला होणार आहे. तर अ‍ॅड. अमोल बोरखडे म्हणाले, विधानसभेत एकमेकांविरुद्ध प्रचार करीत असलेले पक्ष स्थानिक बाजार समितीत, जिल्हा परिषदेत मात्र एकत्र सत्ता भोगत आहे. याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. 

‘ते’ उमेदवार म्हणजे, शेंदूर फासलेले दगड
कोणताही उमेदवार हा स्वत:च्या पायावर उभा असला पाहिजे. केवळ पक्षश्रेष्ठींनी उभा केलेला माणूस आपल्या मतदारसंघासाठी पात्र असेलच असे नाही. एका पक्षातून दुसरीकडे उड्या मारणारे कोणत्या उपयोगाचे? उमेदवार हा पात्र माणूस असला पाहिजे. पक्षाने उभा केलेला माणूस म्हणजे दगडा शेंदूर फासण्याचा प्रकार आहे, अशी टीका अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केली.

जे काश्मिरात झाले, ते विदर्भातही शक्य
वेगळा विदर्भ देण्यात दिल्ली सरकार हीच मोठी अडचण आहे. ३७० कलम बदलून जसे काश्मिरचे विभाजन करण्यात आले, त्याच प्रमाणे घटनेतील तरतुदी वापरून स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करणे शक्य आहे. विदर्भच काय, बुंदेलखंड, गोरखालँड या अविकसित भागांनाही स्वतंत्र राज्याचा दर्जा देणे शक्य आहे. मात्र, मोदी-शहांची इच्छा नसेल, तर कोणीही वेगळा विदर्भ देऊ शकत नाही. फडणवीस-गडकरी यांच्याही शब्दाला दिल्लीत वजन नाही, अशी टीका अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केली.

Web Title: Elections are the center of the city, hence the neglect of villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.