विजेचा ‘स्थिर आकार दर’ वर्षभरात दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 10:25 PM2018-11-11T22:25:21+5:302018-11-11T22:25:42+5:30

वीज नियामक आयोगाच्या निर्णयानुसार वीज वितरण कंपनीने वीजबिलाच्या स्थिर आकारात वाढ केली आहे. ही वाढ वर्षभरात तीन वेळा झाली आहे. यात विविध गटात ५० ते ८८ टक्के वाढ झाली आहे. २०२० पर्यंत स्थिर आकार दरात वाढ करण्यात येणार आहे.

Electric 'fixed size rate' double in the year | विजेचा ‘स्थिर आकार दर’ वर्षभरात दुप्पट

विजेचा ‘स्थिर आकार दर’ वर्षभरात दुप्पट

Next
ठळक मुद्देग्राहकांना भुर्दंड : नियामक आयोगाने वर्षभरात केली तीन वेळा वाढ, आणखी दोन वर्षे वाढीचे संकेत

रूपेश उत्तरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वीज नियामक आयोगाच्या निर्णयानुसार वीज वितरण कंपनीने वीजबिलाच्या स्थिर आकारात वाढ केली आहे. ही वाढ वर्षभरात तीन वेळा झाली आहे. यात विविध गटात ५० ते ८८ टक्के वाढ झाली आहे. २०२० पर्यंत स्थिर आकार दरात वाढ करण्यात येणार आहे. यामुळे ग्राहकांना भुर्दंड सोसावा लागणार आहे.
कोळशाचा तुटवडा, डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या किमती यामुळे ट्रान्सपोर्टचे वाढलेले दर, वीज गळती याचा परिणाम वीज निर्मितीवर झाला आहे. वीज नियामक आयोगाने स्थिर आकारात वाढ सूचविली आहे. २०१६ ते २०२० पर्यंत चार टप्प्यात विजेची दरवाढ होणार आहे. यावर्षी तीन वेळा विविध गटातील स्थिर आकार दरात वाढ झाली आहे. मार्च २०१७ मध्ये स्थिर आकार दर ५५ रूपये होता. मार्च २०१८ मध्ये घरगुती ग्राहकांचा स्थिर आकार दर ६० रूपये झाला. एप्रिलमध्ये ६५ रूपये, सप्टेंबरमध्ये ८० रूपये करण्यात आला. हे वाढीव दर आॅक्टोबरच्या बिलात लावून आले आहेत. अशा पद्धतीने घरगुती थ्री फेज आणि वाणिज्यिक ग्राहकांच्या बिलात वाढ झाली.
घरगुती थ्री फेज ग्राहकांचा मार्च १८ मधील स्थिर आकर दर १७० रूपये होता. एप्रिलमध्ये १८५ रूपये, सप्टेंबरमध्ये ३०० रूपये करण्यात आला. वाणिज्यिक ग्राहकांचा मार्च १८ मध्ये स्थिर आकार दर २५० रूपये होता. एप्रिलमध्ये २७० रूपये, सप्टेंबरमध्ये ३५० रूपयांवर पोहचला. एप्रिल २०१९ मध्ये आयोगाने आणखी वाढ सूचविली आहे. यातून वीज कंपनी विविध दुरूस्तीचे काम हाती घेणार आहे. मात्र सर्वसामान्य ग्राहकांच्या वीज बिलात वाढीव रकमा येणार आहे.
बिलाच्या युनिटचे दर वाढले
वीजबिलाच्या युनिटमध्ये वाढ करण्यासाठी एमईआरसीने प्रथम सुनावणी घेतली. सप्टेंबरला त्याची अंमलबजावणी सुरू केली. आॅक्टोबरला हे वाढीव बिल लावून आले. यामध्ये युनिटला २२ ते २४ पैशांची वाढ नोंदविण्यात आली. यामुळे ग्राहकांच्या वीजबिलात वाढ झाली आहे. ही वाढ यापुढेही कायम राहण्याची शक्यता असल्याने वीज ग्राहक संघटना आक्रमक पवित्र्यात आहे.
२०० युनिटचा स्पॅन तूर्त नाही
वीजबिलाचे धोरण ठरविताना ० ते १०० आणि १०० ते ३०० युनिटचा एक स्पॅन हा नियम बदलवावा. त्याऐवजी १०० ते २०० युनिट असा स्पॅन तयार करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने केली आहे. हा विषय एमईआरसीपुढे ठेवण्यात आला. त्यावर अमरावती आणि नागपुरात सुनावणी झाली. मात्र कुठलाही निर्णय झाला नाही.

Web Title: Electric 'fixed size rate' double in the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज